कंटेनर ‘काळ’ बनून आला होता… मग एसटी चालक ‘देवदूत’ झाला!; 7 प्रवाशांचे असे वाचवले जीव!

मेहकर (विष्णू आखरे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चालकाच्या सतर्कमुळे एसटी बसमधील सात प्रवाशांचा जीव वाचला. भरधाव कंटेनर बसला मागून घासले. सुदैवाने कंटेनरचा धोका वेळीच बसचालकाने ओळखल्याने बस रस्त्याच्या कडेला घेतली होती. ही घटना चिखली-मेहकर रस्त्यावरील नागझरी फाट्यानजिक आज, 23 जानेवारीला सकाळी सातच्या सुमारास घडली. सूत्रांच्या माहितीनुसार, साखरखेर्डावरून मेहकरकडे एसटी बस (क्रमांक एमएचव 40 …
 

मेहकर (विष्णू आखरे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चालकाच्या सतर्कमुळे एसटी बसमधील सात प्रवाशांचा जीव वाचला. भरधाव कंटेनर बसला मागून घासले. सुदैवाने कंटेनरचा धोका वेळीच बसचालकाने ओळखल्याने बस रस्त्याच्या कडेला घेतली होती. ही घटना चिखली-मेहकर रस्त्यावरील नागझरी फाट्यानजिक आज, 23 जानेवारीला सकाळी सातच्या सुमारास घडली.


सूत्रांच्या माहितीनुसार, साखरखेर्डावरून मेहकरकडे एसटी बस (क्रमांक एमएचव 40 एन 8200) सात प्रवासी घेऊन जात होती. त्याचवेळी भरधाव चिखलीकडे जाणार्‍या कंटेनरने (क्रमांक ईजी 70 इ 5675) बसला नागझरी फाट्यानजीक ओव्हरटेकच्या नादात मागून जबर धडक दिली. परंतु सतर्कतेमुळे भरधाव येणार्‍या कंटेनरला पाहून चालक एम. एल. गिरे यांनी ताबडतोब बस रस्त्याच्या कडेला उतरवली. परंतु तरीसुद्धा कंटेनरने बसला मागून घासत जाऊन बसचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान केले. परंतु चालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील 7 प्रवाशांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. चालकाने सतर्कता दाखवली नसती तर मोठी जीवित हानी झाली असती, असे प्रवाशांनी यावेळी बोलताना सांगितले. सुदैवाने सकाळची वेळ असल्यामुळे बसमध्ये प्रवासी संख्यासुद्धा कमी होती. कंटेनर चालकाविरुद्ध मेहकर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास मेहकर पोलीस स्टेशन करीत आहेत.