कंत्राटदाराने शेगावमध्ये घेतला गळफास; प्रॉपर्टी डिलरने फसवल्याने नैराश्य येऊन टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा;

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तार कंपाऊंड करून देणाऱ्या 45 वर्षीय कंत्राटदाराने उंबराच्या झाडाला दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शेगाव शहरातील शिवहरी लेआऊटच्या परिसरात आज, 22 मे रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास समोर आली.रामहरी पांडुरंग बघेवार (रा. जगदंबानगर, शेगाव) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. साधा सरळ आणि मनमिळाऊ स्वभावाच्या रामहरी बघेवार …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः तार कंपाऊंड करून देणाऱ्या 45 वर्षीय कंत्राटदाराने उंबराच्‍या झाडाला दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्याची खळबळजनक घटना शेगाव शहरातील शिवहरी लेआऊटच्‍या परिसरात आज, 22 मे रोजी सकाळी साडेअकराच्‍या सुमारास समोर आली.
रामहरी पांडुरंग बघेवार (रा. जगदंबानगर, शेगाव) असे आत्‍महत्‍या केलेल्याचे नाव आहे. साधा सरळ आणि मनमिळाऊ स्‍वभावाच्‍या रामहरी बघेवार यांनी आत्‍महत्‍या केल्‍याने त्‍यांच्‍या मित्रपरिवार आणि शेजाऱ्यांनाही धक्‍का बसला आहे. आत्‍महत्‍येचे निश्चित कारण समोर आले नसले तरी एका प्रॉपर्टी डिलरशी झालेल्या वादातून त्‍यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्‍याची चर्चा आहे. बघेवार यांनी शेवटच्‍या क्षणी ज्‍यांना फोन लावून भावना मोकळ्या केल्या, त्‍यांनी या आत्‍महत्‍येला या प्रॉपर्टी डिलरला जबाबदार धरले असून, या प्रॉपर्टी डिलरचे नावही त्‍यांनी एका व्हिडिओत सांगितले आहे.

या प्रॉपर्टी डिलरचे काम बघेवार यांनी केले होते. मात्र त्‍याचे पैसे देण्याऐवजी तुला प्‍लॉट देतो असे म्‍हणून या डिलरने त्‍यांना थांबवले होते. मात्र प्‍लॉटही नाही आणि पैसेही देत नसल्‍याने बघेवार यांनी या डिलरला जाब विचारला असता दोघांत वाद होऊन तुला काय करायचे ते कर असे डिलरने धमकावल्याची चर्चा होत आहे. बघेवार यांच्‍या पश्चात पत्‍नी, 2 मुले, 1 मुलगी असा परिवार आहे.