कंपनीच्‍या टार्गेटचा बळी!; विष घेऊन कर्मचाऱ्याची आत्‍महत्‍या, सुसाईड नोटमध्ये मॅनेजरवर गंभीर आरोप, मोताळा तालुक्‍यातील घटना

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कंपनीने दिलेले टार्गेट पूर्ण केले नाही म्हणून मॅनेजर करत असलेला छळ असह्य झाल्याने कर्मचाऱ्याने विष घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मोताळा तालुक्यातील धामणगाव बढेजवळील बेहरदड शिवारात ६ ऑगस्टला घडली. या प्रकरणी मृतक कर्मचाऱ्याच्या भावाने काल, २ सप्टेंबरला धामणगाव बढे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी पुण्याच्या SIS कंपनीच्या मॅनेजरविरुद्ध गुन्हा …
 
कंपनीच्‍या टार्गेटचा बळी!; विष घेऊन कर्मचाऱ्याची आत्‍महत्‍या, सुसाईड नोटमध्ये मॅनेजरवर गंभीर आरोप, मोताळा तालुक्‍यातील घटना

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कंपनीने दिलेले टार्गेट पूर्ण केले नाही म्‍हणून मॅनेजर करत असलेला छळ असह्य झाल्याने कर्मचाऱ्याने विष घेऊन आत्‍महत्‍या केल्याची धक्‍कादायक घटना मोताळा तालुक्‍यातील धामणगाव बढेजवळील बेहरदड शिवारात ६ ऑगस्‍टला घडली. या प्रकरणी मृतक कर्मचाऱ्याच्‍या भावाने काल, २ सप्‍टेंबरला धामणगाव बढे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी पुण्याच्‍या SIS कंपनीच्‍या मॅनेजरविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

मनोज महारू राठोड (३२, रा. पळसखेड काकर, ता. जामनेर जि. जळगाव) असे आत्‍महत्‍या केलेल्याचे नाव आहे. अमोल विश्वनाथ सिंगनाथ (३५, रा. उरूळी कांचन, ता. हवेली जि. पुणे) असे गुन्‍हा दाखल झालेल्या मॅनेजरचे नाव आहे. विनोद महारू राठोड (रा. पळसखेड काकर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. त्‍यांनी तक्रारीत म्‍हटले आहे, की मनोजला मॅनेजर अमोलने कंपनीने दिलेले टार्गेट पूर्ण केले नाही असे म्हणून जास्तीचे २० हजार रुपये मागितले. पैसे न दिल्यास नोकरीवरून कमी करून एक रुपयासुद्धा मिळू देणार नाही, असे धमकावले.

त्‍याचा मानसिक व शारीरिक छळ केल्यामुळे व समाजात बदनामी केल्यामुळे मनोजने ६ ऑगस्‍टला बेहरदड शिवारात विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये मॅनेजरला आत्‍महत्‍येस जबाबदार धरले. याबाबत मनोजच्‍या भाऊ आणि आई-वडिलांनी मॅनेजरला जाब विचारला असता त्‍याने कोणतेही म्हणणे एेकून घेतले नाही. त्‍यामुळे पोलिसांत तक्रार देण्यात आली. तपास पोलीस उपनिरिक्षक श्री. गंद्रे करत आहेत.