कंपन्यांच्‍या ‘सुरक्षे’चा ठेका घेणाऱ्याचेच घर फोडले; दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला, खामगावातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विविध कंपन्यांना सुरक्षारक्षक पुरवणाऱ्या एजन्सी मालकाच्या घरातच धाडसी चोरी झाली. ही घटना खामगाव शहरातील गजानन कॉलनीत 24 मे रोजी दुपारी समोर आली. चोरट्यांनी दोन हजार रुपये रोख व 69 हजार रुपयांचे दागिने लंपास केले. खामगाव शहर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अनिल भारत सावंग (47) यांची दक्षता सिक्युरिटी गार्ड …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः विविध कंपन्यांना सुरक्षारक्षक पुरवणाऱ्या एजन्सी मालकाच्या घरातच धाडसी चोरी झाली. ही घटना खामगाव शहरातील गजानन कॉलनीत 24 मे रोजी दुपारी समोर आली. चोरट्यांनी दोन हजार रुपये रोख व 69 हजार रुपयांचे दागिने लंपास केले. खामगाव शहर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

अनिल भारत सावंग (47) यांची दक्षता सिक्युरिटी गार्ड नावाची एजन्सी असून, ते विविध कंपन्यांना सुरक्षा रक्षक पुरवतात. 24 मे रोजी दुपारी 11:30 वाजता ते त्यांच्या भावाच्‍या घरी दालफैल भागात गेले होते. त्याच दिवशी सायंकाळी साडेचारला ते परतले असता घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. बेडरूममधील लोखंडी कपाट फोडून त्यातून नगदी 2 हजार व सोन्याचे व चांदीचे 69 हजारांचे दागिने चोरीला गेल्याचे त्‍यांना दिसले. त्‍यांनी तशी तक्रार शहर पोलीस ठाण्यात दिली.