5819 कोरोना पॉझिटिव्‍ह रुग्‍णांवर उपचार सुरू

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 16 मे रोजी नव्याने 872 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने सध्या रुग्णालयांत 5819 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 884 रुग्णांना दिवसभरात डिस्चार्ज देण्यात आला. 7 जणांचे बळी गेल्याने एकूण बळींचा आकडा 513 वर गेला आहे. उपचारादरम्यान माक्ता कोक्ता (ता.खामगाव) येथील 42 वर्षीय पुरुष, हंसराजनगर खामगाव येथील 70 वर्षीय महिला, बुलडाणा येथील 36 वर्षीय …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 16 मे रोजी नव्‍याने 872 पॉझिटिव्‍ह रुग्‍णांची भर पडल्‍याने सध्या रुग्‍णालयांत 5819 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 884 रुग्‍णांना दिवसभरात डिस्‍चार्ज देण्यात आला. 7 जणांचे बळी गेल्याने एकूण बळींचा आकडा 513 वर गेला आहे. उपचारादरम्यान माक्ता कोक्ता (ता.खामगाव) येथील 42 वर्षीय पुरुष, हंसराजनगर खामगाव  येथील 70 वर्षीय महिला, बुलडाणा येथील 36 वर्षीय पुरुष, सागवान (ता. बुलडाणा) येथील 45 वर्षीय पुरुष, मेहकर येथील 55 वर्षीय महिला, वडशिंगी (ता. जळगाव जामोद) येथील 65 वर्षीय पुरुष, नायगाव (ता. मेहकर) येथील 55 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

4017 कोरोना अहवाल निगेटिव्ह

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 4889 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4017 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 872 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 577 व रॅपीड टेस्टमधील 295 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 1507 तर रॅपिड टेस्टमधील 2510 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेले अहवाल

बुलडाणा शहर : 62, बुलडाणा तालुका : वरवंड 1, साखळी 4, सुंदरखेड 1,  पाडळी 8, चांडोळ 1,  शिरपूर 5, सागवान 1, रायपूर 6, मातला 1, देऊळघाट 1, खुपगाव 2, डोमरुळ 1, सातगाव 1, दहीद 4, सोयगाव 1, गोंधनखेड 1, गिरडा 6, चौथा 3, गुम्मी 1, इजलापूर 1, पोखरी 1, भादोला 1, जनुना 1, कोलवड 1, बोरखेड 1, नांद्राकोळी 1, शिवणा 2, दुधा 1, मोताळा शहर : 5,  मोताळा तालुका : बोराखेडी 1, आडविहीर 3, कोथळी 1, रिधोरा 1,  सारोळा मारोती  1, पान्हेरा 1, लपाली 6, लिहा 1, अंतरी 6, गुगळी 2, उबाळखेड 1, वाघजाळ 2, फर्दापूर 1, ब्राह्मंदा 1, महाळुंगी 1, तळणी 3, पिंपळगाव गवळी 3, पिंपळगाव नाथ 5, धामणगाव बढे 1, किन्होळा 1, पुन्हई 1, शेलापूर 5, राजूर 1, चिचपूर 2, इब्राहिमपूर 1,  खामगाव शहर : 35,  खामगाव तालुका :  पारखेड 1, उमरा 1, वर्णा 1, कोक्ता 6, दुधा 2, रोहना 2, जनुना 1, पिंप्राळा 3, लांजुड 1, टेंभूर्णा 2, कोलोरी 1, शेलोडी 1, नागझरी 1, उंबरा 2, पोरज 1, हिंगणा 1, अटाळी 1, निळेगाव 1,  शेगाव शहर : 18,  शेगाव तालुका : पहूरजिरा 5, जलंब 2, भास्तन 1, वरखेड 3, चिंचोली 1, टाकळी विरो 1, सांगावा 1, जवळा 4, टाकळी हाट 3, तींत्रव 1, गोडेगाव 1, टाकळी धारव 1,  चिखली शहर : 49 , चिखली तालुका :  वरखेड 1, जांभोरा 1, शेलूद 3, रानअंत्री 1, पांढर देव 1, गोद्री 1, भोरसा भोरसी 2, कोनड 2, साकेगाव 1, खंडाळा 2, माळशेंबा 1, दिवठाना 1, टाकरखेड 1, मेरा बुद्रूक 3, मेरा खुर्द 2,  करणखेड 1, चांधई 2, पाटोदा 1, हातणी 2, मोहाखेड 8, शेळगाव आटोळ 1, पिंपरी आंधळे 1, अंतरी खेडेकर 5, खापरखेडा 2, धानोरी 2, अमडापूर 1, मंगरूळ 1, शिंदी हरळी 1, अंतरी कोळी 1, अंचरवाडी 1, वळती 1, सातगाव भुसारी 1, पेठ 2, गिरोला 1, घनमोडी 1,  मलकापूर शहर :18, मलकापूर तालुका :  वरखेड 2,  तांदुळवाडी 1, तालसवाडा 1, वाकोडी 1, वाघुड 1, मोरखेड 1, पान्हेरा 1, भालेगाव 1, लासुरा 4, रणगाव 1, भानगुरा 1,  देऊळगाव राजा शहर : 12, देऊळगाव राजा तालुका :  सिनगाव जहाँगिर 2, सावखेड भोई 2, गारगुंडी 1, गोंधनखेड 2, पिंपळगाव 2, असोला जहाँगिर 10, जुमडा 1, कुंभारी 1, सावखेड नागरे 1, खल्याळ गव्हाण 1, भान खेड 1, देऊळगाव मही 4, टाकरखेड भा. 1, बायगाव 1, पोखरी 1, वैजापूर 1, वाघाळा 1, निमखेड 1, सिंदखेड राजा शहर : 7, सिंदखेड राजा तालुका :  दुसरबीड 2,  साखरखेर्डा 5,  हनवतखेड 1, सावखेड तेजन 3, राहेरी 1, वर्दाडी 1, असोला 1, सेलू 5, वाकड जहाँगिर 2, विझोरा 1, देवखेड 1, वरोडी 1, शेंदूर्जन 1, बाळसमुद्र 1, मोहाडी 1, पिंपरखेड 3, पाष्टा 1, पळसखेड चक्का 1, जळगाव 1, पिंपळगाव सोनारा 1, किनगाव राजा 1, शिवणी टाका 1, जांभोरा 1, बुट्टा 1, वडगाव 1, दरेगाव 1,  मेहकर शहर : 27, मेहकर तालुका :  हिवरा आश्रम 4,  डोणगाव 6, जानेफळ 2,  अंजनी 6, देऊळगाव माळी 2, बोरी 5, परडा 1, महागाव 1, कळमेश्वर 2, जवळा 1, भोसा 4,  मोहदरी 1, अंतरी देशमुख 2, उटी 6, आरेगाव 1, कुंबेफळ 1, बेलगाव 1, मारोती पेठ 2, गजरखेड 2, सावंगी माळी 1, पिंपळगाव उंडा 2, नांद्रा धांडे 2, गोमेधर 3, कल्याणा 1, नेत्नसा 2, सावंगी वीर 1, उमरा 2, गवांधळा 2, घुटी 1, पांचाळा 2, पिंपळगाव माळी 5, शहापूर 2, परतापूर 1, खंडाळा 2, कोयाळी 1, पांग्री काटे 1, शेलगाव काकडे 1, दुर्गबोरी 1, उमरा देशमुख 39, खापरखेड 1, खळेगाव 1, लोणी 1,  संग्रामपूर तालुका : अकोली खुर्द 2,  जळगाव जामोद शहर : 29, जळगाव जामोद तालुका :  पिंपळगाव काळे 3, सुनगाव 7, निंभोरा 9, खांडवी 3, तिवडी 1, अडोळ 2, पळशी वैद्य 1, धानोरा 11, मडाखेड 6, इलोरा 1, वडशिंगी 1, तरोडा 1, भेंडवळ 2, सावरगाव 2, आसलगाव 5, चारबन 2,  काल गाव 1, पळशी सुपो 3, बोराळा 1, जामोद 2, गाडेगाव 1, राजुरा 1, मानेगाव 1, कुरणगड 1, नांदुरा शहर : 6, नांदुरा तालुका : टाकरखेड 1, तिकोडी 1,  पिंपळगाव धांडे 2, वाडी 1, सोनज 1, गव्हाड 1, शेंबा 1, निमगाव 3, वडनेर 1, धानोरा 1, पिंपळगाव आढाव 1, खांडवा 1, मोमिनाबाद 1, पोटळी 1,  लोणार शहर : 12, लोणार तालुका : पिंपळनेर 1,  बिबी 1,  चिखला 3, देऊळगाव कोळ 2, शिंदी 2,पिंपरी 2, शिवणी पिसा 1, भोरवांत 1, आरडव 3, शारा 2, धायफळ 1, वझर सरकटे 1, वेणी 4, परडा 1, सावरगाव मुंढे 1, कोनाटी 1, तळेगाव 1, किनगाव जट्टू 1, ब्राह्मण चिकना 1, खापरखेडा 1, पारडी 2, अगरवाडी 3, तांबोळा 1, परजिल्हा बाळापूर 3, तेल्हारा 1, पारस 1, पारध 3, वाशिम 1, पातूर 1, जाफराबाद 3 अशाप्रकारे जिल्ह्यात 872 रुग्ण आढळले आहेत.

5819 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू

आज 884 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 415098 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 71584 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 2701 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 77916 कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी 71584 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 5819 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 513 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.