कडक लॉकडाऊनमध्येही जिल्ह्यात 2 तरुणी बेपत्ता

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आज, 11 मे रोजी कडक लॉकडाऊनची जिल्ह्यात सुरुवात झाली असली तरी, त्याचबरोबरच जिल्ह्यातून 2 तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार अमडापूर आणि जळगाव जामोद पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. उंद्री (ता. चिखली) संजीवनी राजू शेजोळ ही 18 वर्षीय तरुणी आणि जळगाव जामोदच्या पंचशीलनगरातील सौ. रेखा रामकृष्ण जाधव ही 29 वर्षीय विवाहित तरुणी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः आज, 11 मे रोजी कडक लॉकडाऊनची जिल्ह्यात सुरुवात झाली असली तरी, त्‍याचबरोबरच जिल्ह्यातून 2 तरुणी बेपत्ता झाल्‍याची तक्रार अमडापूर आणि जळगाव जामोद पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

उंद्री (ता. चिखली) संजीवनी राजू शेजोळ ही 18 वर्षीय तरुणी आणि जळगाव जामोदच्‍या पंचशीलनगरातील सौ. रेखा रामकृष्ण जाधव ही 29 वर्षीय विवाहित तरुणी घरातून कुणाला काही न सांगता निघून गेल्या आहेत. काल, 10 मे रोजी अंजनी बुद्रूक (ता. मेहकर) येथील 22 वर्षीय सौ. पूजा मंगेश वानखेडे आणि मलकापूरच्‍या रामदेवनगरातील वर्षा हुकूमचंद गुरूबक्‍स ही 25 वर्षीय तरुणी घरातून निघून गेल्याची तक्रार अनुक्रमे डोणगाव आणि मलकापूर शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.