कडक लॉकडाऊन? नव्हे दिलासाच!! दुकानांची वेळ वाढविली, कोचिंग क्लासेसला मुभा

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा वाढता व न आटोक्यात येणारा प्रकोप लक्षात घेता लॉकडाउन अधिक कडक करण्यात येईल ही अफवारूपी शक्यता अखेर फोल ठरली! याऐवजी जिल्हा प्रशासनाने मागील सवलती कायम ठेवत उलट दुकानदारांना 1 तासाची मुभा दिलीय! तसेच कोचिंग क्लासेसला मर्यादित मुभा दिली आहे. आज, 22 मार्चला काढण्यात आलेल्या आदेशाद्वारे या …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा वाढता व न आटोक्यात येणारा प्रकोप लक्षात घेता लॉकडाउन अधिक कडक करण्यात येईल ही अफवारूपी शक्यता अखेर फोल ठरली! याऐवजी जिल्हा प्रशासनाने मागील सवलती कायम ठेवत उलट दुकानदारांना 1 तासाची मुभा दिलीय! तसेच कोचिंग क्लासेसला मर्यादित मुभा दिली आहे. आज, 22 मार्चला काढण्यात आलेल्या आदेशाद्वारे या मुभा देण्यात आल्या असतानाच 31 मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश वाढविण्यात आले आहेत.
सर्व प्रकारच्या आस्थापना व दुकानांना सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. डेअरी सकाळी 6 ते दुपारी 3 आणि संध्याकाळी 6 ते रात्री 9:30 पर्यंत सुरू राहतील. सर्व परीक्षा वेळेवर घेण्यात येणार असून, विध्यार्थ्यांना हॉल तिकिट बाळगणे आवश्यक आहे. गॅस, पेट्रोल सेवा सुरू, हायवेवरील धाबे, पेट्रोल पंप, कार्यालयात 50 टक्के हजेरी, मालवाहतूक, उद्योग, 50 टक्के प्रवाशांसह एस.टी. वाहतूक या सर्व सुविधा कायम ठेवण्यात आल्या आहेत. लग्नास 50 तर अंत्यविधीस 20 व्यक्तींना परवानगी राहील. आंदोलनास बंदी आहे. संध्याकाळी 6 ते सकाळी 6 संचारबंदी हे आदेश कायम राहतील.
…आणि क्लासेस
दरम्यान कोचिंग क्लासेस सकाळी 9 ते सायंकाली 5 वाजेदरम्यान सुरू राहतील. मात्र 25 टक्के क्षमतेसह किंवा किमान 20 विद्यार्थी, 2 बॅचमध्ये अर्धा तासचा अवकाश, पालकांचे संमतीपत्र बंधनकारक आहे. मास्क, सॅनिटायझर, एका बाकावर 1 विद्यार्थी आदी अटी लागू राहतील.