कडाक्याच्या थंडीतच राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः केंद्र सरकारने आणलेले कृषी विधेयक शेतकरी विरोधी असून, यातून अंबानी, अदानींचाच विकास होणार आहे असा आरोप दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून आणि विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 11 जानेवारीपासून धरणे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनाचा आज चौथा दिवस होता. ईव्हीएममुळे देशातील लोकशाही धोक्यात आली असून …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः केंद्र सरकारने आणलेले कृषी विधेयक शेतकरी विरोधी असून, यातून अंबानी, अदानींचाच विकास होणार आहे असा आरोप दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून आणि विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 11 जानेवारीपासून धरणे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनाचा आज चौथा दिवस होता.

ईव्हीएममुळे देशातील लोकशाही धोक्यात आली असून जनतेला नको असलेले लोकच सत्तेत बसतात.त्यामुळे ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्या, अशी मागणी बुलडाणा लाइव्हशी बोलताना आंदोलकांनी केली. 16 जानेवारीपर्यंत आंदोलन चालणार आहे. बहुजन मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज ठाकरे यांच्या नेतृत्वात सुषमा जाधव, दीपाली इंगळे, अशोक इंगळे, योगेश्‍वर कांबळे, सुशील इंगळे, मधुकर आराख, विशाल वाकोडे, अविनाश मिसाळ यांनी आंदोलनात भाग घेतला.़