कमी चाचण्या; कमी पॉझिटिव्ह! मात्र मृत्यूचे थैमान कायम!! 9 जण दगावले

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे विकेंडला कमी चाचण्या व अहवालाची परंपरा कायम राहिल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 427 पर्यंत घसरल्याचे चित्र आहे. मात्र बळींची संख्या 9 असल्याने यंत्रणांची धाकधूक कायम आहे. आज, 24 मे रोजी 3409 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून, त्यातील 427 पॉझिटिव्ह आले आहेत. बुलडाणा तालुक्यात 90, देऊळगाव राजा …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी : बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे विकेंडला कमी चाचण्या व अहवालाची परंपरा कायम राहिल्याने पॉझिटिव्ह रुग्‍णांची संख्या 427 पर्यंत घसरल्याचे चित्र आहे. मात्र बळींची संख्या 9 असल्याने यंत्रणांची धाकधूक कायम आहे.

आज, 24 मे रोजी 3409 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून, त्यातील 427 पॉझिटिव्ह आले आहेत. बुलडाणा तालुक्‍यात 90, देऊळगाव राजा 91 व संग्रामपूर 60 वगळता अन्य 9 तालुक्यांतील आकडे 39 च्या खाली आहेत. मलकापूरमध्ये अनेक दिवसांनंतर एकही बाधित आढळला नाहीये! सिंदखेडराजा 38, खामगाव 31,  शेगाव 32, चिखली 19, मेहकर 5, नांदुरा व लोणार प्रत्येकी 10, मोताळा 11, जळगाव 21 अशी अन्य तालुक्यातील आकडेवारी आहे.

9 मृत्यू

दरम्यान बुलडाणा महिला रुग्णालयातील 6 रुग्णांचा मृत्यू झाला. खामगावच्‍या सामान्य रुग्णालयात 2 तर शेगावच्‍या सामान्य रुग्‍णालयात एक रुग्ण दगावला.