कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्‍महत्‍या; चिखली तालुक्‍यातील घटना

अमडापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कर्जबाजारीपणाला कंटाळून 36 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना करवंड (ता. चिखली) येथे 5 मे रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास समोर आली. कडूबा भानुदास आठवे (रा. शेलोडी, ता. चिखली) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. कडूबा यांच्या नावावर 6 एकर शेती आहे. त्यांच्यावर एसबीआयच्या शेलसूर शाखेचे 1 लाख 30 …
 

अमडापूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कर्जबाजारीपणाला कंटाळून 36 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना करवंड (ता. चिखली) येथे 5 मे रोजी दुपारी साडेबाराच्‍या सुमारास समोर आली.

कडूबा भानुदास आठवे (रा. शेलोडी, ता. चिखली) असे आत्‍महत्‍या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. कडूबा यांच्‍या नावावर 6 एकर शेती आहे. त्‍यांच्‍यावर एसबीआयच्‍या शेलसूर शाखेचे 1 लाख 30 हजार रुपये कर्ज आहे. सततच्‍या नापिकी आणि वाढत असलेल्या कर्जाच्‍या डोंगरामुळे नैराश्य आलेल्या कडूबा यांनी करवंड शिवारातील पळसाच्‍या झाडाला गळफास घेतला. घटनेची माहिती गजानन जगन्‍नाथ यादव (50, रा. शेलोडी) यांनी अमडापूर पोलीस ठाण्यात दिली. कडूबा यांच्या पश्चात तीन मुली, पत्‍नी, आई असा परिवार आहे.