कर्जमाफीच्या यादीत नाव असलेल्या शेतकर्‍यांसाठी बातमी…आधार प्रमाणिकरण करा!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना – 2019 ही महत्त्वाकांक्षी योजना घोषित केलेली असून, या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या गावनिहाय याद्या टप्याटप्याने प्रसिध्द होत आहेत. योजनेच्या निकषानुसार यादीत नाव असलेल्या शेतकर्यांनी महा ई-सेवा केंद्र/ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करणे गरजेचे आहे.आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योजनेचा लाभ देण्याची …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना – 2019 ही महत्त्वाकांक्षी योजना घोषित केलेली असून, या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या गावनिहाय याद्या टप्याटप्याने प्रसिध्द होत आहेत. योजनेच्या निकषानुसार यादीत नाव असलेल्या शेतकर्‍यांनी महा ई-सेवा केंद्र/ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करणे गरजेचे आहे.आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही होते. आजरोजी जिल्ह्यात योजने अंतर्गत 1 लक्ष 78 हजार 683 शेतकर्‍यांच्या विशिष्ट क्रमांकासह याद्या प्रसिध्द झालेल्या आहेत. यापैकी 1 लक्ष 70 हजार 576 शेतकर्‍यांचे आधार प्रमाणिकरणाची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. उर्वरित 8 हजार 106  शेतकर्‍यांचे अद्यापही आधार प्रमाणिकरण पूर्ण न केल्यामुळे योजनेच्या निकषानुसार हे शेतकरी प्रलंबित आहेत. ज्या शेतकर्‍यांचे कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलेले असून अद्यापही आधार प्रमाणिकरण केलेले नाही अशा शेतकर्‍यांनी महा ई-सेवा केंद्र / ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून तात्काळ आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच कर्जमुक्तीच्या यादीमधील जे शेतकरी मयत आहेत, अशा शेतकर्‍यांच्या बाबतीत त्यांचे वारसाने संबंधित बँकेमध्ये जाऊन त्यांची कर्जखात्यात वारस लावण्याची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. महेंद्र चव्हाण यांनी केले आहे.