कशी निसर्गाने दैना मांडली…१८, १९ फेब्रुवारीच्‍या अवकाळीने ११५ गावांना तडाखा, १८ हजार हेक्‍टर क्षेत्र बाधित!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाचे संकट पुन्हा घोंगावत असताना, बर्ड फ्लूने तोंडचे पाणी पळवले असताना १८ व १९ फेब्रुवारीला झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील १८ हजार हेक्टर क्षेत्र बाधित केल्याचा अंदाज असून, ११५ गावांना यात तडाखा बसल्याची शक्यता आहे. कृषी विभागानेही या शक्यतेला दुजोरा दिल्याने आता तातडीने पंचनामे होऊन शेतकऱ्यांना मदत मिळणे गरजेचे असून, यासाठी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाचे संकट पुन्‍हा घोंगावत असताना, बर्ड फ्‍लूने तोंडचे पाणी पळवले असताना १८ व १९ फेब्रुवारीला झालेल्‍या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील १८ हजार हेक्‍टर क्षेत्र बाधित केल्‍याचा अंदाज असून, ११५ गावांना यात तडाखा बसल्‍याची शक्‍यता आहे. कृषी विभागानेही या शक्‍यतेला दुजोरा दिल्याने आता तातडीने पंचनामे होऊन शेतकऱ्यांना मदत मिळणे गरजेचे असून, यासाठी लोकप्रतिनिधींनीही सरकारकडे तातडीने पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

  • चिखली तालुक्‍यातील उत्रादा येथील शेतकरी रामेश्वर मनोहर इंगळे यांच्‍या शेतातील हरभऱ्याची सुडी वीज पडून पेटल्‍याने त्‍यांचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले.
  • बुलडाणा तालुक्‍यातील तांदूळवाडी येथील बाबुराव भाऊराव रिंढे या शेतकऱ्याचा अंगावर वीज पडून मृत्‍यू झाला. जळगाव जामोद तालुक्‍यातील १६ गावे बाधित होऊन १५४ हेक्‍टरवरील गहू उद्‌ध्वस्‍त झाला.
  • देऊळगाव राजा तालुक्‍यातील ४१ गावे बाधित होऊन दहा हजार हेक्‍टर क्षेत्रावरील गहू, हरभरा, ज्‍वारी, मका, भाजीपाला, डाळिंबा आदी पिकांचे नुकसान झाले.
  • संग्रामपूर तालुक्‍यातील १० गावे बाधित होऊन ९२ हेक्‍टर क्षेत्र बाधित झाल्‍याचा अंदाज आहे.
  • मेहकर तालुक्‍यात ३ गावे बाधित होऊन ५५ हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे तर लोणार तालुक्‍यातील २५ गावे बाधित होऊन ३ हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्‍याचा अंदाज आहे.
  • सिंदखेड राजा तालुक्‍यातील १९ गावे बाधित झाली असून, ४ हजार हेक्‍टर क्षेत्र बाधित झाल्याचे सांगण्यात येत आहे.