काँग्रेसचा “हा’ नेता म्हणतो, “फोन टॅपिंगनं कर्नाटक, मध्य प्रदेशातील सरकार पाडली’

मुंबई : पेगॅसस प्रकरणाने देशात नाही तर जगात खळबळ माजविली आहे. पेगॅससचा आधार घेऊन आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ‘काँग्रेसची मध्य प्रदेश आणि कर्नाटकमधील सरकार भाजपने फोन टॅपिंग करून पाडले,’ असा गंभीर आरोप केला. पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, की फोन टॅपिंगचा दुरुपयोग करून कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील सरकार पाडले. केंद्र सरकारने फोन …
 

मुंबई : पेगॅसस प्रकरणाने देशात नाही तर जगात खळबळ माजविली आहे. पेगॅससचा आधार घेऊन आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ‘काँग्रेसची मध्य प्रदेश आणि कर्नाटकमधील सरकार भाजपने फोन टॅपिंग करून पाडले,’ असा गंभीर आरोप केला.

पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, की फोन टॅपिंगचा दुरुपयोग करून कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील सरकार पाडले. केंद्र सरकारने फोन टॅपिंगचा गैरवापर केला, ही गंभीर बाब आहे. हे कृत्य घटनेच्या विरोधातील आहे. त्यामुळे संबंधितांनी राजीनामा द्यावा. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी. पॅगेसस प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणी राजभवनाबाहेर धरणे धरणार असल्याची माहिती पटोले यांनी दिली. या प्रकरणात राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात येणार असून तसे निवेदन राज्यपालांकडे देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.