काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड Buldana Live कार्यालयात… शिवसेना, राष्ट्रवादीसह भाजपालाही हादरे देणारे गौप्यस्फोट!; बुलडाण्यातील विधानसभेच्‍या “इच्‍छुकां’चीही वाढवली धडधड!!

पुढच्या सर्व निवडणुका काँग्रेसकडून स्वबळावर; बुलडाण्यात विधानसभेची उमेदवारी मागणार, लवकरच जिल्ह्यातील बऱ्याच भाजपा पदाधिकाऱ्यांची “घरवापसी’;बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा, मो. 9822988820)ः बुलडाण्याची आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेसतर्फे लढविण्याचा मनोदय व्यक्त करतानाच, ही निवडणूक स्वबळावर होईल. केवळ विधानसभा, लोकसभाच नव्हे तर भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड यांनी बुलडाणा …
 
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड Buldana Live कार्यालयात… शिवसेना, राष्ट्रवादीसह भाजपालाही हादरे देणारे गौप्यस्फोट!; बुलडाण्यातील विधानसभेच्‍या “इच्‍छुकां’चीही वाढवली धडधड!!

पुढच्‍या सर्व निवडणुका काँग्रेसकडून स्वबळावर; बुलडाण्यात विधानसभेची उमेदवारी मागणार, लवकरच जिल्ह्यातील बऱ्याच भाजपा पदाधिकाऱ्यांची “घरवापसी’;
बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा, मो. 9822988820)ः
बुलडाण्याची आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेसतर्फे लढविण्याचा मनोदय व्यक्‍त करतानाच, ही निवडणूक स्वबळावर होईल. केवळ विधानसभा, लोकसभाच नव्हे तर भविष्यातील स्थानिक स्वराज्‍य संस्‍थांच्या निवडणुकाही काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड यांनी बुलडाणा लाइव्‍हशी बोलताना दिली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील आणि वेळप्रसंगी या निवडणुकांत यशासाठी मित्रपक्षांवरही टीका करण्यास, त्‍यांचे घर फोडण्यास काँग्रेस मागेपुढे पाहणार नाही, अशी स्‍पष्टोक्‍ती श्री. राठोड यांनी केली. जिल्ह्यात काँग्रेस मजबूत असून, जिल्हाध्यक्ष बदलाबद्दल कार्यकर्ते बोलत असले तरी तो अंतिम अधिकार नानांना आहे. भाजपाची बरीचशी मंडळी काँग्रेसमध्ये घरवापसी करणार असून, काही दिवसांतच त्‍यांचा मोठा प्रवेश सोहळा घडवला जाईल, असा दावाही त्‍यांनी केला. याशिवाय काँग्रेस मजबूत होत असल्याचे पाहून मित्र पक्षांचेही काही नेते, पदाधिकारी येऊ शकतात, अशी टिप्पणीही त्‍यांनी केली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जिल्हा दौऱ्यानंतर, काल, 12 जूनला दुपारी उपाध्यक्ष संजय राठोड यांनी बुलडाणा लाइव्ह कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. सर्वप्रथम लाइव्ह ग्रुपचे समूह सल्लागार मनोज सांगळे यांनी त्‍यांचे पुष्पगुच्‍छ देऊन स्वागत केले. त्‍यानंतर जिल्हा प्रतिनिधी कृष्णा सपकाळ यांनी त्‍यांची मुलाखत घेतली. पक्षातील फेरबदल, संघटन, व्यूहरचनेवर प्रकाश टाकताना त्‍यांनी राजकीय महत्त्वाकांक्षीही लपवली नाही. मागीलवेळीही तिकिट मागितले होते, पण काही कारणांमुळे दिले गेले नाही. पण यावेळी सर्वोतोपरी तिकिटासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री. राठोड यांनी सांगितले.

सोनिया गांधी, मुकूल वासनिक, नानांशी असलेल्या जवळीकीचा आणि आजवर केलेल्या पक्षकार्याचा फायदा तिकिट मिळवून देण्यात होईल, असा विश्वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला. जिल्ह्यात पक्षात गटबाजी असल्याचे अप्रत्यक्षरित्या मान्य करताना त्‍यांनी गटबाजी लिमिटपर्यंत असावी. निवडणुकीत ती नसावी, असे मत व्यक्‍त केले. लिमिटमध्ये असलेल्या गटबाजीचा पक्षाला फायदाच होत असल्याचे ते म्‍हणाले.