काँग्रेसने ठाकरे सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा

दिग्विजियसिंह यांचे बंधू आ.लक्ष्मणसिंह यांची मागणी भोपाळ : परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब प्रकरणाचे पडसाद आता इतर राज्यांतही उमटायला लागले आहेत. काँग्रेसने ठाकरे सरकारला दिलेला पाठिंबा काढून घ्यावा व महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंग यांचे बंधू लक्ष्मणसिंह यांनी केली आहे. परमबीरसिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप हे गंभीर असून …
 

दिग्विजियसिंह यांचे बंधू आ.लक्ष्मणसिंह यांची मागणी

भोपाळ : परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब प्रकरणाचे पडसाद आता इतर राज्यांतही उमटायला लागले आहेत. काँग्रेसने ठाकरे सरकारला दिलेला पाठिंबा काढून घ्यावा व महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंग यांचे बंधू लक्ष्मणसिंह यांनी केली आहे. परमबीरसिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप हे गंभीर असून त्यात तथ्य आहे, असे वाटते. त्यामुळे काँग्रेसने ठाकरे सरकारला दिलेला पाठिंबा काढून घ्यायला हवा. मध्य प्रदेश विधानसभेचे आमदार असलेल्या आ. लक्ष्मणसिंह यांनी ट्विटरवर यावर भाष्य केले आहे. त्यात त्यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांना टॅग केले असून त्यात म्हटले आहे की, जर १०० कोटी रुपये मुंबई पोलिसांकडून दरमहा महाराष्ट्राचे गृहमंत्री वसूल करत असतील आणि जर ही बाब सत्य असेल तर देशमुख देशाचे मुख असू शकत नाहीत. आघाडी सरकार मागे पडताना (पिछडती) दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसने सरकारला दिलेला पाठिंबा परत घेतला
पाहिजे. त्यांच्या या वक्तव्याचे अद्याप कुणी समर्थन केलेले नाही. परंतु या एकूणच प्रकरणामुळे काँग्रेस पक्षातही अस्वस्थता पसरली आहे.