काँग्रेस म्हणते, शहांसोबत काय चर्चा झाली ते सांगा!; शिवसेना म्हणते, भेटले असतील तर वावगे काय?

शरद पवार-शहांच्या भेटीचे महाकवित्व सुरूच मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी अहमदाबादेत जाऊन भाजपाचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या गुप्त भेटीबाबत राजकीय तर्कवितर्क लढविले जात आहेत. शिवाय राज्यातील महाविकास आघाडीतही त्यावरून चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीतील मतभेद वरचेवर उघड होत असतानाच पवार- शहा भेट झाल्याने त्यातून नव्या समीकरणांची शक्यताही …
 

शरद पवार-शहांच्या भेटीचे महाकवित्व सुरूच

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी अहमदाबादेत जाऊन भाजपाचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या गुप्त भेटीबाबत राजकीय तर्कवितर्क लढविले जात आहेत. शिवाय राज्यातील महाविकास आघाडीतही त्यावरून चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीतील मतभेद वरचेवर उघड होत असतानाच पवार- शहा भेट झाल्याने त्यातून नव्या समीकरणांची शक्यताही शोधली जाऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या दोन नेत्यांची भेट झालीच नाही, असा दावा केला. अशा अफवा भाजपकडूनच पसरवल्या जात असल्याचा आरोप मलिक यांनी केला. दुसरीकडे त्या भेटीबाबत शहा यांना विचारले असता सगऴ्याच गोष्टी उघड करायच्या नसतात, असे मुत्सद्दी उत्तर देत भेटीबाबतचा संभ्रम कायम ठेवला. भाजपच्या राज्यातील नेत्यांनी मात्र, शहा जे काही सांगायचे ते सांगून गेले. त्यांनी योग्य तो सूचक संदेश दिला आहे, असे स्पष्ट करत भेटीचा सस्पेन्स कायम राखला. परंतु महाविकास आघाडीचे दोन पक्ष शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मात्र, त्यावरून परस्परविरोधी मते व्यक्त झाली आहेत. शहा-पवार यांच्या भेटीदरम्यान त्यांच्यात नेमकी चर्चा काय झाली? हे देशाला कळायला हवे. संबंधित नेते व पक्षांनी ते स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते संदीप दीक्षित यांनी म्हटले आहे. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काही कामानिमित्त दोन नेत्यांची भेट झाली असेल तर त्यात वावगे असे काय आहे? असा प्रतिप्रश्न करत देशाच्या गृहमंत्र्यांना कुणीही भेटू शकतो. राजकारणात कोणतीही भेट गुप्त नसते. फक्त प्रत्येक गोष्ट जाहीरपणे सांगितली जातेच असे नाहीऋ महाविकास आघाडी स्थिर आहे. ठाकरे सरकारला कुठलाही धोका नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. संजय राऊत यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केल्याने महाविकास आघाडीत तणाव वाढल्याचीही चचा सुरू झाली आहे.