काकापासून वाचवा… बुलडाण्यातून अपहरण करून पुतण्याला बेदम मारझोड!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विक्रीला काढलेली शेतजमीन आम्हालाच कमी भावात द्या यासाठी वाद घालून चुलत भावांनी गाडीत कोंबून अपहरण केले व मारझोड केली. नंतर जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पांग्री (ता. बुलडाणा) येथील तरुणाने काल, १० ऑगस्ट रोजी रात्री बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात केली. त्यावरून तिघा बापलेकांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभय …
 
काकापासून वाचवा… बुलडाण्यातून अपहरण करून पुतण्याला बेदम मारझोड!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विक्रीला काढलेली शेतजमीन आम्हालाच कमी भावात द्या यासाठी वाद घालून चुलत भावांनी गाडीत कोंबून अपहरण केले व मारझोड केली. नंतर जीवे मारण्याची धमकी दिल्‍याची तक्रार पांग्री (ता. बुलडाणा) येथील तरुणाने काल, १० ऑगस्ट रोजी रात्री बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात केली. त्‍यावरून तिघा बापलेकांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभय श्रीकृष्ण गवई (१९, रा. नांद्रकोळी ता. बुलडाणा) याने तक्रार दिली, की त्याची व त्याचे काका गणेश गुलाबराव गवई (रा. पांग्री) यांची पांग्री शिवारात शेजारीशेजारी शेती आहे. अभयने २४ गुंठे शेती विक्रीला काढली आहे. ही जमीन आम्हालाच कमी भावात दे या कारणावरून अभयचे काका व मुले त्याच्याशी नेहमी भांडत असतात. ९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ च्या सुमारास अभय बस स्टँडसमोरून धाड नाक्याकडे पायी जात होता. तेव्हा अपंग शाळेसमोरील वळणावर मागून पांढरी चारचाकी आली.

या वाहनात अभयचे काका व त्याचे ३ चुलतभाऊ असे चौघे जण होते. वाहनातल्या लोकांनी त्याला मारहाण केली व गाडीत कोंबले. गाडीत अभयचे तोंड दाबून गाडी पांग्री शिवारातील त्याच्या शेतात नेली. तिथेही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. कसाबसा तो त्यांच्या तावडीतून सुटला. जंगलातून पळत हतेडी येथे आला. तिथून एका माणसाच्या फोनवरून सख्ख्या भावाला घडलेली घटना सांगितली. त्यानंतर दोन्ही भावांनी बुलडाणा शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून अभयचा काका गणेश गुलाबराव गवई, चुलतभाऊ संघपाल गणेश गवई, धम्मपाल गणेश गवई व राष्ट्रपाल भानुदास गवई (सर्व रा. पांग्री) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.