काठीने आधी मुलाचे डाेके फोडले, बाप आवरायला तर त्‍याच्‍या डोक्‍यात वार; खामगाव तालुक्‍यातील महिलेचा प्रताप

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव तालुक्यातील बोरजवळा येथे बापलेकास काठीने मारून जखमी केल्याची घटना 13 एप्रिल रोजी रात्री 8 च्या सुमारास घडली.प्रमोद परशराम वानखडे (45, रा. बोरजवळा) यांनी 14 एप्रिल रोजी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार केली की, माझ्या घराशेजारी मंगल पंढरी हेलोडे हा परिवारासह राहत असून त्याला दारू पिण्याचे व्यसन …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः खामगाव तालुक्यातील बोरजवळा येथे बापलेकास काठीने मारून जखमी केल्‍याची घटना 13 एप्रिल रोजी रात्री 8 च्‍या सुमारास घडली.
प्रमोद परशराम वानखडे (45, रा. बोरजवळा) यांनी 14 एप्रिल रोजी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार केली की, माझ्या घराशेजारी मंगल पंढरी हेलोडे हा परिवारासह राहत असून त्याला दारू पिण्याचे व्यसन असल्याने तो गावात कोणाशीही विनाकारण वाद करून भांडण करतो. 13 एप्रिल रोजी रात्री 8 च्‍या सुमारास मंगल होलोडे खूप दारू पिलेला होता व आमच्या घरासमोर जोरजोराने शिविगाळ करत होता. मी त्याला कोणास शिविगाळ करतो असे विचारले असता त्याने पुन्‍हा शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी त्याची पत्‍नी कविता काठी घेऊन मला मारायला आली. त्यावेळी माझा लहान मुलगा तिला समजवण्याचा प्रयत्‍न करत असताना तिने त्याच्या कपाळावर हातातील काठी जोरात मारली असता जखम होऊन रक्त निघाले. तेव्हाच तिला आवरण्यासाठी गेलो असता कविता हेलोडे हिने माझ्या डोक्यात काठी मारल्यामुळे माझे सुद्धा डोके फुटले व रक्त निघाले. या तक्रारीवरून पिंपळगाव राजा पोलिसांनी पती-पत्‍नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.