कापड व्‍यावसायिक जिल्‍हाधिकाऱ्यांना भेटले; ‘निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी घातले साकडे!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्य सरकारने लॉकडाऊन लावताना कापड व्यावसायिकांच्या अडचणींचा विचार केला नाही. लॉकडाऊनच्या निर्णयाचा फेरविचार करत निर्बंध शिथिल करण्यात यावे, या मागणीसाठी बुलडाण्यातील रेडिमेड अँड क्लॉथ मार्केट असोसिएशनचे पदाधिकारी आज, 7 एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांना भेटले. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार 8 दिवसांपूर्वीच शहरातील सर्व दुकान मालक, कर्मचारी यांनी कोविड चाचणी केली आहे. त्यातील सर्वच रिपोर्ट …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः राज्य सरकारने लॉकडाऊन लावताना कापड व्यावसायिकांच्‍या अडचणींचा विचार केला नाही. लॉकडाऊनच्या निर्णयाचा फेरविचार करत निर्बंध शिथिल करण्यात यावे, या मागणीसाठी बुलडाण्यातील रेडिमेड अँड क्लॉथ मार्केट असोसिएशनचे पदाधिकारी आज, 7 एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांना भेटले.

शासनाने दिलेल्या निर्देशानुसार 8 दिवसांपूर्वीच शहरातील सर्व दुकान मालक, कर्मचारी यांनी कोविड चाचणी केली आहे. त्यातील सर्वच रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. शासनाने दिलेल्या निर्देशांचे व्यापारी पालन करत आहेत. पुढेही करत राहतील. मात्र शासनाने लॉकडाऊनच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. एका दुकानावर केवळ मालकच नाही तर दुकानात काम करणाऱ्या 4 ते 5 कामगारांच्या परिवाराचेही जीवन अवलंबून असते. दुकानदार आर्थिक अडचणीत सापडले असून, त्‍यांच्‍यावर कर्जाचा बोझा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दिलासा देण्याऐवजी सरकारकडून आणखी संकट वाढविण्यात येत आहेत. त्‍यामुळे निर्बंध शिथिल करावे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. या वेळी टिकमसेठ वाधवाणी, दिलीप कोठारी, विरेंद्र छाजेड, कृष्णा खुराणा, सतिश कोठारी, शुभम कोठारी, अजय भारती, अभय पाटील, दीपक पंजवानी, सनी परियानी, त्रिशूल खारोडे आदी व्यापारी उपस्थित होते.