कामगारांच्या तक्रारी सोडविण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे १ मेच्या सकाळी ७ पर्यंत संपूर्ण राज्यात संचारबंदी (लॉकडाऊन) सुरू झालेली असून, पुढील आदेशापर्यंत ती लागू राहणार आहे. जिल्ह्यातील कामगारांच्या तक्रारी, आंतरराज्यीय स्थलांतरीत कामगारांच्या समस्यांचे निराकारण करण्यासाठी मदत कक्ष, नियंत्रण कक्ष, तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने सरकारी कामगार अधिकारी, बुलडाणा या कार्यालयाच्या दूरध्वनीक्रमांक ०७२६२-२४२६६३ …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः कोरोनाच्‍या गंभीर परिस्‍थितीमुळे १ मेच्‍या सकाळी ७ पर्यंत संपूर्ण राज्यात संचारबंदी (लॉकडाऊन) सुरू झालेली असून, पुढील आदेशापर्यंत ती लागू राहणार आहे.  जिल्ह्यातील कामगारांच्या तक्रारी, आंतरराज्यीय स्थलांतरीत कामगारांच्या समस्यांचे निराकारण करण्यासाठी मदत कक्ष, नियंत्रण कक्ष, तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने सरकारी कामगार अधिकारी, बुलडाणा या कार्यालयाच्या दूरध्वनीक्रमांक ०७२६२-२४२६६३ यावर स्थलांतरीत कामगारांच्या समस्या निराकरण तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असून, विभाग स्तरावर भ्रमणध्वनी क्रमांक ८६६८४९६४१८ उपलब्‍ध असेल. यावर व्‍हॉट्‌सअप, एसएमएस किंवा प्रत्यक्ष संपर्क साधल्यास समस्‍यांचे निराकारण केले जाईल. बुलडाणा जिल्ह्यातील कामगारांनी या दूरध्वनी, भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी, बुलडाणा यांनी केले आहे.