कायमस्वरुपी ग्रामसेवक नसल्याने खोळंबली विकासकामे, दुसरबीडच्या सरपंचांची तक्रार

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील सर्वात मोठी सतरा सदस्य संख्या असलेली दुसरबीड ग्रामपंचायतीला सहा महिन्यांपासून कायमस्वरुपी ग्रामसेवक नाही. यामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजात अडचणी निर्माण होत आहेत. समस्या सुटत नसल्याने नागरिकही त्रस्त झाले आहेत. कायमस्वरुपी ग्रामसेवक देण्याची मागणी महिला सरपंच ज्योतीताई सांगळे यांनी केली आहे. आधीचे ग्रामविकास अधिकारी ए. डी. फुपाटे यांच्याविरुद्ध …
 

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील सर्वात मोठी सतरा सदस्य संख्या असलेली दुसरबीड ग्रामपंचायतीला सहा महिन्यांपासून कायमस्वरुपी ग्रामसेवक नाही. यामुळे ग्रामपंचायतीच्‍या कामकाजात अडचणी निर्माण होत आहेत. समस्या सुटत नसल्याने नागरिकही त्रस्‍त झाले आहेत. कायमस्वरुपी ग्रामसेवक देण्याची मागणी महिला सरपंच ज्योतीताई सांगळे यांनी केली आहे.

आधीचे ग्रामविकास अधिकारी ए. डी. फुपाटे यांच्‍याविरुद्ध प्रशासकीय कार्यवाही होऊन चौधरी ग्रामसेवक रूजू झाले होते. मात्र ते नेहमी आजारी असल्याने गावात येत नव्हते. त्यामुळे तात्पुरता प्रभार दानवे यांच्याकडे देण्यात आला आहे. मात्र त्यांच्याकडे इतरही गाव असल्याने ते सुद्धा गावात वेळेवर येत नसल्याने गावाच्‍या विकासकामांत अनेक अडथळे निर्माण होत आहे.

गटविकास अधिकाऱ्यांकडे तोंडी वजा लेखी तक्रारी देऊनही अद्याप कायमस्वरूपी ग्रामसेवक मिळाला नाही. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मागणीची तात्काळ दखल घेऊन दुसरबीड ग्रामपंचायतला कायमस्वरूपी ग्रामसेवक देण्याची मागणी सरपंच सौ. ज्योतीताई सांगळे व सदस्यांनी केली आहे.