काय गुलाबराव… कोणती बायको कधी असं करते व्‍हय… दारूड्या पतीविरुद्ध पत्‍नी पोलीस ठाण्यात!; चिखली तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बायकोच्या भावाशी भांडण आहे. त्याच्याशी पटत नाही म्हणून बायकोलाच तिच्या भावाला मारहाण करायला सांगणाऱ्या महाभाग पतीविरोधात अमडापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.सौ. इंदूबाई गुलाबराव वानखेडे (40, रा. धोडप, ता. चिखली) यांनी पतीविरोधात तक्रार दिली आहे. इंदूबाई यांच्या पती गुलाबरावला दारूचे व्यसन आहे. तो पत्नीला नेहमी मारहाण करायचा. त्यामुळे इंदूबाईंचे भाऊ …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बायकोच्या भावाशी भांडण आहे. त्याच्याशी पटत नाही म्हणून बायकोलाच तिच्या भावाला मारहाण करायला सांगणाऱ्या महाभाग पतीविरोधात अमडापूर पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.
सौ. इंदूबाई गुलाबराव वानखेडे (40, रा. धोडप, ता. चिखली) यांनी पतीविरोधात तक्रार दिली आहे. इंदूबाई यांच्‍या पती गुलाबरावला दारूचे व्यसन आहे. तो पत्‍नीला नेहमी मारहाण करायचा. त्यामुळे इंदूबाईंचे भाऊ कविदास उत्तम पवार (रा. सव) यांनी इंदूबाईला माहेरी यायला सांगितले होते. त्यावरून कविदास आणि गुलाबराव यांच्यात वाद झाला. 14 एप्रिलला दुपारी गुलाबराव वानखेडे दारू पिऊन घरी आला. तू तुझ्या भावाला मार, असे त्‍याने सांगितले. माझा भाऊ असल्याने मी त्याला मारणार नाही, असे इंदूबाईने म्हटल्याने संतापलेल्या गुलाबरावने घरातील कुऱ्हाडीच्या दांड्याने पत्नीला जबर मारहाण केली. यात इंदूबाई जखमी झाल्या. आज, 16 एप्रिलला सकाळी अमडापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुलाबराव वानखेडे(45) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.