कारने दुचाकीला उडवले, दोन तरुण जखमी, चिखली तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कारने दुचाकीला धडक दिली. यात दोघे जखमी झाले. ही घटना चिखली-बुलडाणा रस्त्यावरील सवणा फाट्याजवळ काल, 13 मे रोजी रात्री 8 च्या सुमारास घडली. शंतनु सुनील देशमाने, अनिकेत पडघान (रा. रायपूर, ता. चिखली) अशी जखमींची नावे आहेत. दोघे कोरोना रुग्णाला पाहण्यासाठी चिखलीला येत होते. काल संध्याकाळी ते मोटारसायकलने (क्र. MH-28-BE-1983) रायपूरहून …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कारने दुचाकीला धडक दिली. यात दोघे जखमी झाले. ही घटना चिखली-बुलडाणा रस्‍त्‍यावरील सवणा फाट्याजवळ काल, 13 मे रोजी रात्री 8 च्‍या सुमारास घडली.

शंतनु सुनील देशमाने, अनिकेत पडघान (रा. रायपूर, ता. चिखली) अशी जखमींची नावे आहेत. दोघे कोरोना रुग्‍णाला पाहण्यासाठी चिखलीला येत होते. काल संध्याकाळी ते मोटारसायकलने (क्र. MH-28-BE-1983)  रायपूरहून निघाले. सवणा फाट्याजवळ समोरून येणाऱ्या कारने (क्र. MH-04-DB-7653) त्‍यांना उडवले. यात शंतनूच्‍या उजवा पायाच्‍या मांडीला व उजव्या हाताच्‍या मनगटाला मार लागून फ्रॅक्चर झाले आहे. डोक्याला डाव्या बाजूला मार लागला आहे. त्याचा मित्र अनिकेत पडघानच्‍या उजव्या पायाला मांडीवर व पोटरीवर मार लागला आहे. कारचालक अपघात होताच घटनास्थळावर गाडी सोडून पळून गेला. दोन्‍ही जखमींवर जवंजाळ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. या प्रकरणी जखमी शंतनूचे काका राजेश देशमाने यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.