कारने दुचाकीला उडवले, 1 ठार, दोघे गंभीर जखमी, चिखली तालुक्‍यातील घटना

चिखली (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्विफ्ट डिझायर कारने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत 1 जण जागीच ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना चिखली-बुलडाणा रस्त्यावरील अंत्रीतेली फाट्याजवळ आज, 11 मे रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. शिवदास नारायण सोळंकी (45, रा. येवता, ता. चिखली) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सूत्रांनी सांगितले, की …
 

चिखली (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः स्विफ्‍ट डिझायर कारने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत 1 जण जागीच ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना चिखली-बुलडाणा रस्‍त्‍यावरील अंत्रीतेली फाट्याजवळ आज, 11 मे रोजी सकाळी साडेआठच्‍या सुमारास घडली.

शिवदास नारायण सोळंकी (45, रा. येवता, ता. चिखली) असे ठार झालेल्या व्‍यक्‍तीचे नाव आहे. सूत्रांनी सांगितले, की शिवदास सोळंकी हे आपल्या मुलाच्‍या मदतीने त्‍यांचे बंधू विजय सोळंकी यांना बुलडाणा येथे दवाखान्यात घेऊन येत होते. विजय सोळंकी यांना रक्‍तदाबाचा जास्त त्रास होत होता. त्‍यांना मध्ये बसवून गावातीलच विशाल परिहार यांच्‍या मोटारसायकलवर (क्र. MH 28 N 8613) हे बापलेक घेऊन येत असताना अंत्री तेली फाट्यावर भरधाव स्विफ्ट डिझायर कारने (क्र. क्र DD01 A2194) त्‍यांना उडवले. यात शिवदास सोळंकी जागीच ठार झाले तर विजय सोळंकी (50) व विशाल शिवदास सोळंकी (19, दोघे रा. येवता) गंभीर जखमी झाले. त्‍यांना तातडीने बुलडाणा येथील जिल्हा रुग्‍णालयात हलविण्यात आले. प्रकृती अधिकच गंभीर असल्याने नंतर औरंगाबादला हलविण्यात आले. या अपघात प्रकरणी उमेश विजय सोळंकी यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, त्‍यावरून कारचालक मनेश गणेश माळी (रा. राऊतवाडी, चिखली) याच्‍याविरोधात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.