कारने मोटारसायकलला मागून उडवले, मुलगा ठार, केटरिंग ठेकेदार गंभीर; शेगावजवळील दुर्घटना

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कारने मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिल्याने केटरिंगचे काम करणारा मुलगा ठार झाला. ही घटना शेगाव – खामगाव रोडवरील कनारखेड फाट्याजवळ काल, ३ ऑगस्टला रात्री आठच्या सुमारास घडली. विनायक गोपाल साठे (२५, रा. टाकळी हाट, ता. शेगाव) असे ठार झालेल्या मुलाचे नाव असून, त्याला घरी सोडायला निघालेले विष्णू सहदेव मोरखडे (४२) …
 

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कारने मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिल्याने केटरिंगचे काम करणारा मुलगा ठार झाला. ही घटना शेगाव – खामगाव रोडवरील कनारखेड फाट्याजवळ काल, ३ ऑगस्‍टला रात्री आठच्‍या सुमारास घडली. विनायक गोपाल साठे (२५, रा. टाकळी हाट, ता. शेगाव) असे ठार झालेल्या मुलाचे नाव असून, त्‍याला घरी सोडायला निघालेले विष्णू सहदेव मोरखडे (४२) गंभीर जखमी झाले आहेत.

विष्णू मोरखडे यांनी या अपघात प्रकरणी शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, त्‍यावरून पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. मोरखडे हे शेगावातील हाॅटेल विघ्नहर्ता येथे वाहनचालक आहेत. सोबत ते केटरिंग ठेकेदार म्‍हणूनही काम करतात. काल ३ अॉगस्‍टला विघ्नहर्ता हॉटेलमध्ये लग्नाचा कार्यक्रम असल्याने त्‍या ठिकाणी मोरखडे हे केटरिंग ठेकेदार म्‍हणून होते.

रात्री काम आटोपून ते मोटारसायकलने गावी लासुरा येथे जाण्यासाठी निघाले. त्‍याचवेळी टाकळी हाट येथे राहणारा व सोबत केटरिंगचे काम करणारा मुलगा विनायक साठे हाही त्‍यांच्‍या मोटारसायकलवर बसला. दोघे शेगाव – खामगाव रोडने येत असताना मागू शेगावकडून भरधाव कार आली व त्या कारचालकाने मोटारसायकलला मागून जोरात धडक दिली. यात मोटारसायकलवरील दोघेही रोडच्‍या बाजूला फेकले गेले. दीपक निळे (रा कनारखेड) यांच्‍यासह ग्रामस्‍थांनी धावून जखमींना शेगावच्‍या माऊली हॉस्पिटलमध्ये भरती केले. उपचारादरम्‍यान विनायकचा मृत्‍यू झाला.