कारमधून आलेले 5 दरोडेखोर मेहकरजवळ पकडले!; पेट्रोलपंपावर घालणार होते दरोडा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पेट्रोलपंपावर दरोडा घालण्याच्या उद्देशाने आलेल्या पाच जणांना बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने 26 जानेवारीच्या पहाटे दोनच्या सुमारास मेहकर-डोणगाव रोडवर हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपाजवळ शिताफीने पकडले.बुलडाणा जिल्ह्यात वाढत्या दरोडा आणि चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस अलर्ट झाले असून, त्यातूनच रचलेल्या सापळ्यात हे दरोडेखोर अडकले. संतोष सीताराम पवार (31, रा. चायगाव ता. मेहकर), राजू …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पेट्रोलपंपावर दरोडा घालण्याच्या उद्देशाने आलेल्या पाच जणांना बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने 26 जानेवारीच्या पहाटे दोनच्या सुमारास मेहकर-डोणगाव रोडवर हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपाजवळ शिताफीने पकडले.
बुलडाणा जिल्ह्यात वाढत्या दरोडा आणि चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस अलर्ट झाले असून, त्यातूनच रचलेल्या सापळ्यात हे दरोडेखोर अडकले. संतोष सीताराम पवार (31, रा. चायगाव ता. मेहकर), राजू शिवाजी इंगळे (25, रा. बर्‍हाई पाचला, ता. मेहकर), किरण सोपान चव्हाण (रा. बर्‍हाई पाचला, ता. मेहकर), किशोर मामा चव्हाण (26, रा. बर्‍हाई पाचला ता. मेहकर), आकाश प्रकाश पवार (20, रा. बर्‍हाई पाचला, ता. मेहकर) अशी अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. पेट्रोल पंपाजवळ सोनेरी स्वीफ्ट डिझायर गाडीमध्ये काही व्यक्ती गुन्हा करण्याच्या उद्देशाने दबा धरून बसल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला प्राप्त झाली होती. खबर्‍यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पथकाने पाहणी केली असता कार आढळली. पोलिसांनी अत्यंत शिताफीने कारमधील 5 जणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून कार, दोन धारदार चाकू, दोरी, लाकडी दंडुके, तीन मोबाईल, लोखंडी रॉड आणि मिरची पूड असे साहित्य आणि रोख 3320 रुपये असा 4,34,630 मुद्देमाल जप्त केला. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी दरोडा घालण्याच्या उद्देशाने आल्याचे कबूल केले. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात घरफोड्या आणि दुचाकी चोरल्याचेही त्यांनी कबुल केले. अटक केलेल्या चोरट्यांविरुद्ध जबरी चोरी, घरफोडी, दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या चोरट्यांना मेहकर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे. ही कारवाई कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव), अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा) यांच्या मार्गदर्शनात तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोलीस अंमलदार गजानन गोरले, गजानन आहेर, नदीम शेख, विजय सोनोने, वैभव मगर, सुरेश भिसे यांनी पार पाडली.