कारमधून आले… घर फोडले अन् हाती लागले XXX!

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कारमधून आलेल्या तीन चोरांनी नांदुरा शहरातील दहीगाव रोडवरील गणपतीनगरमध्ये भरदिवसा घरफोडी केली. चोरट्यांनी कपाटातील रोख पाच हजार रुपये चोरून नेले आहेत. ही घटना 9 जानेवारीला घडली असून, या प्रकरणात आज नांदुरा पोलिसांत तक्रार करण्यात आली. नांदुरा पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागात कार्यरत असलेले सचिन नारायण साठे (37, रा. …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कारमधून आलेल्या तीन चोरांनी नांदुरा शहरातील दहीगाव रोडवरील गणपतीनगरमध्ये भरदिवसा घरफोडी केली. चोरट्यांनी कपाटातील रोख पाच हजार रुपये चोरून नेले आहेत. ही घटना 9 जानेवारीला घडली असून, या प्रकरणात आज नांदुरा पोलिसांत तक्रार करण्यात आली.

नांदुरा पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागात कार्यरत असलेले सचिन नारायण साठे (37, रा. गणपतीनगर दहीगाव रोड नांदुरा) यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की 9 जानेवारीला ते कुटुंबासह साल्याच्या लग्नाला यावल (जि. जळगाव) येथे गेले होते. याचाच फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील नगदी पाच हजार रुपये चोरून नेले. घरातील सामानाची फेकझोक करण्यात आली आहे. गणपती नगरमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरदार असल्याने भर दुपारी चोरीची घटना घडल्याने सर्व भयभयीत झाले आहेत. पांढर्‍या रंगाच्या कारमधून तीन चोर आले होते. त्यातील एक कारमध्ये बसून होता व दोघांनी घराचे कुलूप तोडून चोरी केली. पाहुणे आले असतील या कारणाने याकडे कोणी लक्ष दिलं नाही. ज्या वेळेस शेजार्‍यांनी दरवाजाचे कुलूप तुटलेले पाहिलं तेव्हा त्यांनी फोन करून माहिती दिली. या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.