कार-दुचाकीचा अपघात, एक जखमी; बुलडाण्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुलडाणा शहराजवळ चिखली रोडवरील हॉटेल श्यामसमोर आज, 10 मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. परशराम ओमकार बावस्कर (55, रा. नांद्राकोळी) असे जखमीच दुचाकीस्वाराचे नाव आहे. ते येळगाववरून बुलडाण्याकडे येत होते. त्याचवेळी राहुल सुदाम जाधव (35, रा. हिवरा …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीस्‍वार गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुलडाणा शहराजवळ चिखली रोडवरील हॉटेल श्यामसमोर आज, 10 मे रोजी सायंकाळी साडेपाचच्‍या सुमारास घडली.

परशराम ओमकार बावस्‍कर (55, रा. नांद्राकोळी) असे जखमीच दुचाकीस्‍वाराचे नाव आहे. ते येळगाववरून बुलडाण्याकडे येत होते. त्‍याचवेळी राहुल सुदाम जाधव (35, रा. हिवरा आश्रम) हे बुलडाण्यावरून हिवराआश्रमकडे कुटुंबासह निघाले होते. ऑटोरिक्षा अचानक मध्ये आल्याने दुचाकी आणि कार समोरासमोर येऊन धडक झाली, असे प्रत्‍यक्षदर्शींनी सांगितले. कारमधील कुटुंब सुखरुप आहे. कारचालक राहुल जाधवविरुद्ध बुलडाणा शहर पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. जखमी बावस्‍कर यांच्‍यावर जिल्हा सामान्य रुग्‍णालयात उपचार सुरू असून, त्‍यांचा पाय फ्रॅक्चर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.