कार-दुचाकीचा अपघात; सामाजिक कार्यकर्ते भारत तायडे ठार, पत्नी गंभीर; संग्रामपूर तालुक्यातील घटना

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः इंडिका कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत पातुर्डा (ता. संग्रामपूर) येथील सामाजिक कार्यकर्ते भारत तायडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी गंभीर जखमी आहेत. आज, 10 फेब्रुवारीला दुपारी 12 च्या सुमारास शेगाव- संग्रामपूर रोडवर जस्तपूर फाट्यावर (ता. संग्रामपूर) हा अपघात झाला.भारत तायडे (47) हे त्यांची पत्नी अर्चना भारत तायडे …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः इंडिका कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत पातुर्डा (ता. संग्रामपूर) येथील सामाजिक कार्यकर्ते भारत तायडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी गंभीर जखमी आहेत. आज, 10 फेब्रुवारीला दुपारी 12 च्या सुमारास शेगाव- संग्रामपूर रोडवर जस्तपूर फाट्यावर (ता. संग्रामपूर) हा अपघात झाला.
भारत तायडे (47) हे त्यांची पत्नी अर्चना भारत तायडे यांच्यासह पातुर्डा येथून वरवट बकालकडे दुचाकीने जात होते. दरम्यान जस्तगाव फाट्याजवळ कार आणि दुचाकीत समोरासमोर अपघात घडला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या पती- पत्नीला शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर अकोला येथे हलविण्यात आले. उपचारादरम्यान भारत तायडे यांचा सायंकाळी 5 च्या दरम्यान मृत्यू झाला तर पत्नी अर्चना तायडे यांच्यावर उपचार सुरू आहेत. भारत तायडे सध्या संघाच्या बुलडाणा विभागाच्या समग्र ग्रामविकास विभागाचे प्रमुख होते. तसेच त्यांच्यावर सध्या सुरू असलेल्या राममंदिर निधी संकलन समर्पण अभियानाच्या संग्रामपूर तालुका पालक म्हणून जबाबदारी होती. मनमिळाऊ स्वभाव आणि कुशल संघटक असलेल्या भारत तायडे यांच्या आकस्मिक जाण्याने संघपरिवाराचे मोठे नुकसान झाल्याची शोकसंवेदना विभाग संघचालक चित्तरंजन राठी यांनी व्यक्त केली आहे.