कालवडचा विरोध मोडित काढून हिंगणा भोटाच्‍या पुनर्वसनासाठी जमिनीची मोजणी

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिगाव प्रकल्पात जाणाऱ्या हिंगणा भोटा (ता. नांदुरा) गावाच्या पुनर्वसनासाठी आज, 8 एप्रिलला कालवड (ता. शेगाव) येथील शेतकऱ्यांची जवळपास 40 एकर जमीन मोजण्यात आली. कालवडच्या शेतकऱ्यांचा यास विरोध होता. मात्र पोलिसांच्या ताफ्यापुढे त्यांचे काहीएक चालले नाही. हिंगणा भोटा ग्रामस्थांनी कालवडच्या शेतकऱ्यांची जमीन मागितलेली आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांची …
 

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिगाव प्रकल्‍पात जाणाऱ्या हिंगणा भोटा (ता. नांदुरा) गावाच्‍या पुनर्वसनासाठी आज, 8 एप्रिलला कालवड (ता. शेगाव) येथील शेतकऱ्यांची जवळपास 40 एकर जमीन मोजण्यात आली. कालवडच्‍या शेतकऱ्यांचा यास विरोध होता. मात्र पोलिसांच्‍या ताफ्यापुढे त्‍यांचे काहीएक चालले नाही.

हिंगणा भोटा ग्रामस्थांनी कालवडच्‍या शेतकऱ्यांची जमीन मागितलेली आहे. मात्र ज्‍या शेतकऱ्यांची शेतजमीन गावठाणसाठी जात आहे त्यांचा व कालवड वासियांचा जमीन देण्यास प्रखर विरोध होता. तरीही खामगावच्‍या जिगाव प्रकल्प पुनर्वसन अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात मोजणीला सुरुवात करून मोजणी पूर्णही केली. कालवडमधील काही शेतकऱ्यांची जमीन त्यांच्या गावाच्या पुनर्वसनाकरिता गेलेली आहे व काही उरलेली शेती पाण्याखाली जात आहे. उदरनिर्वाहाचे साधनच हिरावले गेल्याने शेतकऱ्यांचा आता शेतजमीन देण्यास विरोध आहे. यासाठी काही शेतकरी मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या नागपूर खंडपीठातही जात आहेत. जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे लक्ष देऊन कालवड वासियांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी संपादित केलेले शेतकरी व कालवड वासीय करत आहेत. मोजणीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरिक्षक, तहसीलदार जलंबचे ठाणेदार धीरज बांडे यांच्‍यासह एकूण 102 कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.