काल अन्‌ आज ७५२ मंडळांच्या गणेशाचे शांततेत विसर्जन!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः यंदाचा गणेशोत्सव देखील कोरोनाच्या सावटाखाली साजरा झाला असला तरी जिल्ह्यातील लाखो भाविकांच्या उत्साह व भक्तीत तसूभरही कमी नसल्याचे काल आणि आज दिसून आले. काल, १९ सप्टेंबरला रात्री साडेनऊपर्यंत जिल्ह्यातील ७५२ मंडळांच्या गणरायाचे शांततेत विसर्जन करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. यावेळी आबालवृद्ध भाविकांनी लाडक्या गणरायाला …
 
काल अन्‌ आज ७५२ मंडळांच्या गणेशाचे शांततेत विसर्जन!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः यंदाचा गणेशोत्सव देखील कोरोनाच्या सावटाखाली साजरा झाला असला तरी जिल्ह्यातील लाखो भाविकांच्या उत्साह व भक्तीत तसूभरही कमी नसल्याचे काल आणि आज दिसून आले. काल, १९ सप्‍टेंबरला रात्री साडेनऊपर्यंत जिल्ह्यातील ७५२ मंडळांच्या गणरायाचे शांततेत विसर्जन करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. यावेळी आबालवृद्ध भाविकांनी लाडक्या गणरायाला साश्रू नयनांनी व गहिवरल्या मनाने श्रीगणेशाला निरोप देत पुढील वर्षी लवकर येण्याचे कळकळीचे साकडे देखील घातले.

कोरोनामुळे उत्सवावर अनेक अडचणींचे सावट असले तरी त्याचे पालन करून मंडळांनी आपल्या परीने गणेशाची स्थापना केली. काल अनंत चतुर्दशी असली तरी काही ठिकाणी काल, १८ तारखेलाच विसर्जन करण्यात आले. वरिष्ठ पोलीस सूत्रांनुसार ३३ मंडळांनी शनिवारीच विसर्जन करणे पसंत केले. काल सकाळपासूनच जिल्ह्यात ठिकठिकाणी विसर्जन विधी सुरू झाले. मिरवणुकांना मनाई असल्याने रात्री साडेनऊपर्यंत ७१९ मंडळाच्या गणेशाचे विधिवत विसर्जन करण्यात आले, उर्वरित ३५ मंडळाचे विसर्जन आज, २० सप्‍टेंबरला सकाळी पार पडले.