काळरात्र..! पावसाने घर पडल्याने भिंतीखाली दबून 3 वर्षीय बलिकेचा मृत्यू; तीन जण गंभीर जखमी, मेहकर तालुक्यातील घटना

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पावसाने भिंत खचून त्याखाली दबल्याने 3 वर्षीय बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर घरातील अन्य 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रूक येथे घडली. अंजनी बुद्रूक येथील मनवर खाँ मस्तान खा पठाण (52) यांच्या राहत्या घराच्या भिंती 8 जूनच्या रात्री आलेल्या पावसात पडल्या. यात आशिया बी …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पावसाने भिंत खचून त्‍याखाली दबल्याने 3 वर्षीय बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर घरातील अन्य 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रूक येथे घडली.

अंजनी बुद्रूक येथील मनवर खाँ मस्तान खा पठाण (52) यांच्‍या राहत्या घराच्या भिंती 8 जूनच्या रात्री आलेल्या पावसात पडल्या. यात आशिया बी अकबर खा पठाण ( 3) ही चिमुरडी भिंतीखाली दबली होती. तिला बाहेर काढून उपचारासाठी औरंगाबाद येथे नेत असतानाच तिचा मृत्यू झाला. या घरात असणारे हसीना बी मनवर खाँ पठाण (47), मनवर खाँ मस्तान खाँ पठाण (52), इम्रान खाँ मनवर खाँ (27) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना मेहकर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती महसूल विभागाला मिळाल्यावर तलाठी वंदना नाईक यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पावसाने घर पडल्याने घराचे व घरातील संसार उपयोगी साहित्य असे एक ते दीड लाखाचे नुकसान झाले. बालिकेचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.