काळ आला होता पण… असे बचावले मिरकल कंपनीचे रीजनल मॅनेजर!; खामगावातील घटना

नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः आराम करण्यासाठी शासकीय विश्रामगृहात रूम मिळते की नाही हे पहायला मिरकल ग्रो केमीकल कंपनीचे रीजनल मॅनेजर चालकासह उतरले आणि विश्रामगृहाकडे जाऊ लागले. तितक्यात त्यांच्या उभ्या कारला भरधाव वाहनाने जोरात धडक दिली. सुदैवाने कारमध्ये ते स्वतः किंवा त्यांचा चालक नव्हता…यामुळे दोघांचेही प्राण बचावले. ही घटना १४ जुलैला सायंकाळी सहाच्या सुमारास नांदुरा शहरात …
 
काळ आला होता पण… असे बचावले मिरकल कंपनीचे रीजनल मॅनेजर!; खामगावातील घटना

नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः आराम करण्यासाठी शासकीय विश्रामगृहात रूम मिळते की नाही हे पहायला मिरकल ग्रो केमीकल कंपनीचे रीजनल मॅनेजर चालकासह उतरले आणि विश्रामगृहाकडे जाऊ लागले. तितक्‍यात त्‍यांच्‍या उभ्या कारला भरधाव वाहनाने जोरात धडक दिली. सुदैवाने कारमध्ये ते स्वतः किंवा त्‍यांचा चालक नव्‍हता…यामुळे दोघांचेही प्राण बचावले. ही घटना १४ जुलैला सायंकाळी सहाच्‍या सुमारास नांदुरा शहरात घडली.

अतुल रामदास शिरसाठ (३३, रा. समन्वयनगर खामगाव) यांनी या प्रकरणात नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या घटनेत महिंद्रा TUV 300 कारचे (क्र. MH-15-FT-3530) मोठे नुकसान झाले आहे. बफर, हेड लाईट, बोनेट, फोग लम्प व ड्रायव्हर साईडचे गेट व समोरील काचेचे नुकसान झाले. इंजीनमधूनही ऑईल गळत आहे. एकूण एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सायंकाळी साडेपाचला ते ड्रायव्हर अजय ज्ञानोबा भारती कारने खामगाव येथून नांदुरा येथे आले होते. शासकीय विश्रामगृहात विश्रांतीसाठी रुमची आवश्यकता असल्याचे त्‍यांनी ड्रायव्हरला कार थांबविण्यास सांगितली. ड्रायव्हरसह विश्रामगृहात जाऊ लागले. त्‍याचदरम्‍यान भरधाव वाहनाने त्‍यांच्या कारला धडक देऊन पसार झाले. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी अज्ञात वाहनधारकाविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. तपास नापोकाँ श्री. जायभाय करत आहेत.