काळ आला होता, पण…; भलेमोठे झाड अंगावर कोसळले, पण ते बचावले!; दोघे जखमी, मेहकरमधील घटना

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मेहकर तहसील कार्यालयाच्या आवारात असलेले एक जुने निंबाचे झाड कोसळून दोघे जखमी झाले आहेत. आज, ३१ ऑगस्टला सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये ही घटना कैद झाली आहे. लोणी गवळी येथील अशोक वानखेडे हे त्यांच्या कामानिमित्त तहसील कार्यालयात आले होते. त्यांच्या एका मित्रासोबत ते …
 
काळ आला होता, पण…; भलेमोठे झाड अंगावर कोसळले, पण ते बचावले!; दोघे जखमी, मेहकरमधील घटना

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मेहकर तहसील कार्यालयाच्या आवारात असलेले एक जुने निंबाचे झाड कोसळून दोघे जखमी झाले आहेत. आज, ३१ ऑगस्‍टला सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.

तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये ही घटना कैद झाली आहे. लोणी गवळी येथील अशोक वानखेडे हे त्यांच्या कामानिमित्त तहसील कार्यालयात आले होते. त्यांच्या एका मित्रासोबत ते गप्पा मारत असताना अचानक त्यांच्या अंगावर झाड कोसळले. यात वानखेडे जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेत त्यांचा मित्रही किरकोळ जखमी झाला आहे. दोघे जण थोडक्यातच बचावले अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींनी दिली.