काेरोनाचे नवे ४ पॉझिटिव्‍ह; १५ रुग्‍णांना डिस्‍चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 11 सप्टेंबरला कोरोनाचे नवे 4 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, दिवसभरात 15 रुग्णांना बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 47 रुग्ण उपचार घेत आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 403 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 399 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 4 अहवाल पॉझिटिव्ह …
 
काेरोनाचे नवे ४ पॉझिटिव्‍ह; १५ रुग्‍णांना डिस्‍चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 11 सप्‍टेंबरला कोरोनाचे नवे 4 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण आढळले असून, दिवसभरात 15 रुग्‍णांना बरे झाल्याने डिस्‍चार्ज देण्यात आला. सध्या 47 रुग्‍ण उपचार घेत आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 403 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 399 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 4 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 3 व रॅपिड अँटिजेन चाचणीमधील एका अहवालाचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 222 तर रॅपिड टेस्टमधील 177 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
देऊळगाव राजा शहर : 1, देऊळगाव राजा तालुका : नागणगाव 1, बुलडाणा शहर : भीमनगर 1, बुलडाणा तालुका : सावळी 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 4 रुग्ण आढळले आहेत.

कोरोनाबाधितांचा आकडा 87516 वर
आजपर्यंत 703059 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86796 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 850 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 87516 कोरोनाबाधित रुग्ण असून, जिल्ह्यात सध्या कोविडचे 47 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 673 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.