किंचित दिलासा, पण तरीही 362 पॉझिटिव्ह! चिखली शतकाच्या घरात!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी)ः मागील काही दिवसांच्या तुलनेत आज, 13 मार्चला कोरोना बाधितांच्या आकड्यात किंचित घट झाली असली तरी पॉझिटिव्हची संख्या 362 इतकी आली आहे. बुलडाणा तालुक्याला मागे टाकत चिखली तालुक्याने जिल्ह्यात आघाडी घेतली असून, तो शंभरीच्या घरात म्हणजे 92 पर्यंत पोहोचला आहे. शुक्रवारचा दिवस 567 रुग्णसंख्या बरोबरच 36 तास कर्फ्यूचा निर्णय तडकाफडकी मागे घेण्याच्या निर्णयाने …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी)ः  मागील काही दिवसांच्या तुलनेत आज, 13 मार्चला कोरोना बाधितांच्या आकड्यात किंचित घट झाली असली तरी पॉझिटिव्हची संख्या 362 इतकी आली आहे. बुलडाणा तालुक्याला मागे टाकत चिखली तालुक्याने जिल्ह्यात आघाडी घेतली असून, तो शंभरीच्या घरात म्हणजे 92 पर्यंत पोहोचला आहे.

शुक्रवारचा दिवस 567 रुग्णसंख्या बरोबरच 36 तास कर्फ्यूचा निर्णय तडकाफडकी मागे घेण्याच्या निर्णयाने गाजला! याचे पडसाद व माघारीची चर्चा रात्री उशिरापर्यंत उमटत राहिले. या पार्श्वभूमीवर आजचा आकडा 362 वर आला. आज जिल्ह्याच नव्हे बहुतेक तालुक्यांतील रुग्ण संख्येत घट आल्याचे दिसून आले. खामगाव तालुक्‍यात 73 रुग्‍ण, बुलडाणा 54, मलकापूर 46 या तालुक्यांतील आकडे गंभीर वाटावे असेच आहेत. मात्र त्यात तुलनेने घट आली. देऊळगाव राजा 28, लोणार 16, सिंदखेडराजा 17, संग्रामपूर 19 या तालुक्यातील संख्या दिलासादायक ठरली. मोताळा 4, जळगाव 2, शेगाव 5,मेहकर 1, नांदुरा 3 या तालुक्यांत काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या कोविडने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. हा दिलासा असला तरी उद्याची खात्री काय, असा प्रश्न आजच्या आकडेवारीने उपस्थित केलाय! याचे उत्तर कोविड व उद्याची पॉझिटिव्हची संख्याच सांगू शकते.