किडनी स्‍टोनचे ऑपरेशन सांगितले, खर्चही 50 हजार सांगितला… पण शेगावच्‍या डॉक्‍टरांनी अवघ्या 500 रुपयांत चिमुकल्याला केले वेदनामुक्‍त! कसे ते वाचा…

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः 50 हजार रुपये खर्च सांगितलेली शस्त्रक्रिया मुक्ताई बाल रुग्णालयाच्या डॉ. तुकाराम पाटील अढाव यांच्यामुळे करावीच लागली नाही. त्याऐवजी अवघ्या 500 रुपयांच्या साहित्याने 6 वर्षांच्या चिमुकल्याला मुतखड्याच्या वेदनांतून मुक्त करण्याची किमया डॉ. अढाव यांनी केली. 12 एमएच X 5 एमएमचा हा मुतखडा होता. यामुळे गरीब कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला.शेगाव …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः 50 हजार रुपये खर्च सांगितलेली शस्‍त्रक्रिया मुक्‍ताई बाल रुग्‍णालयाच्‍या डॉ. तुकाराम पाटील अढाव यांच्‍यामुळे करावीच लागली नाही. त्‍याऐवजी अवघ्या 500 रुपयांच्‍या साहित्‍याने 6 वर्षांच्‍या चिमुकल्याला मुतखड्याच्‍या वेदनांतून मुक्‍त करण्याची किमया डॉ. अढाव यांनी केली. 12 एमएच X 5 एमएमचा हा मुतखडा होता. यामुळे गरीब कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला.
शेगाव येथील आशीर्वाद कॉलनीमधील रहिवासी नागोराव डाबेराव यांचा मुलगा सुमित यास 3-4 महिन्यांपूर्वी मुतखड्याचा त्रास सुरू झाला. किडनीमध्ये असणारा हा मुतखडा नंतर लघवीच्या ठिकाणी येऊन अडकला. सुमितला लघवी करण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे नागोराव डाबेराव यांनी अकोला येथे डॉक्टरांकडे नेले. डॉक्‍टरांनी त्वरित ऑपरेशन करण्याचा सल्ला देऊन 50 हजार रुपयांच्या आसपास खर्च सांगितला. डाबेराव यांची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे त्‍यांना एवढा खर्च करणे शक्‍य नव्‍हते. कुणीतरी त्‍यांना मुक्ताई बाल रुग्णालयाचे डॉ. तुकाराम पाटील अढाव यांचे नाव सुचवले. डाबेराव यांनी त्वरित डॉ. आढाव यांच्याकडे संपर्क केला.

डॉक्टरांनी त्‍यांना माझे स्किल वापरून प्रयत्‍न करतो, असे सांगत दिलासा दिला. त्यानंतर सुमितला ॲडमिट करण्यात आले. कोणतीही शस्‍त्रक्रिया न करता डॉ. अढाव यांनी पंधरा मिनिटांच्या आत हा बारा एमएम बाय पाच एमएमचा खडा यशस्वीरीत्या बाहेर काढला. विशेष म्हणजे यासाठी फक्‍त पाचशे रुपये खर्च आला तोही साहित्‍यासाठी. जेली व सिरिन आदी छोट्या-मोठ्या इक्विपमेंट त्या पाचशे रुपयांत विकत आणले गेल्या. ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्यावर लगेचच सुमितला लघवीचा त्रास बंद झाला. अशा प्रकारची शस्त्रक्रिया प्रथमच शेगाव शहरात डॉ. अढाव यांनी केली. तेही कोणतीही फी न घेता. त्यांच्या या कामगिरीची जिल्हाभरात चर्चा होत आहे. डॉ. अढाव यांचे मुक्ताई बालरुग्णालय एमएसईबी चौकात आहे.