कित्ती आनंद झाला सांगू…. बुलडाणा सायबर पोलिसांच्‍या ‘या’ कामगिरीमुळे 100 जणांच्‍या आनंदाला उरला नाही पारावार!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोबाइल चोरीला जाण्याचे दुःख मोठे असते. पोलिसांत तक्रार करूनही मोबाइल परत मिळेलच अशी आशा कुणी ठेवत नाही. पण त्यांच्या या निराशेला आशेचा किरण बनविण्याचे काम बुलडाणा सायबर पोलिसांनी केले. त्यांनी 100 मोबाइलचा शोध लावला आणि मूळ मालकांना परत केले… तुम्हाला आश्चर्य वाटले असेल, पण खरंच असं बुलडाण्यात घडलं आहे… पोलीस …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मोबाइल चोरीला जाण्याचे दुःख मोठे असते. पोलिसांत तक्रार करूनही मोबाइल परत मिळेलच अशी आशा कुणी ठेवत नाही. पण त्‍यांच्‍या या निराशेला आशेचा किरण बनविण्याचे काम बुलडाणा सायबर पोलिसांनी केले. त्‍यांनी 100 मोबाइलचा शोध लावला आणि मूळ मालकांना परत केले… तुम्‍हाला आश्चर्य वाटले असेल, पण खरंच असं बुलडाण्यात घडलं आहे… पोलीस मुख्यालयातील प्रभा हॉलमध्ये मूळ मालकांना मोबाइल परत करण्याचा हा अनोखा छोटेखानी सोहळा पार पडला. यावेळी मोबाइल परत मिळाल्याचा आनंद प्रत्‍येकाच्‍या चेहऱ्यावर ओसांडून वाहत होता.

जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांत हरवलेल्‍या, गहाळ झालेल्‍या आणि चोरी गेलेल्या मोबाइलच्या तक्रारींचे प्रमाण वाढल्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्‍या निदर्शनास आले होते. त्‍यांनी याची गंभीरतेने दखल घेऊन सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांना अशा मोबाइलसंबंधीची माहिती प्राप्‍त करून दैनंदिन कामांसोबतच मोबाइलचा शोध घेण्याचे आदेश दिले. श्री. ठाकूर यांनी सायबर पोलीस ठाण्यातील पथकाच्‍या मदतीने मोबाइलचा शोध घेण्यास सुरुवात केली. सायबर पोलिसांनी असे 100 मोबाइल शोधून जप्‍त केले. ते मूळ मालकांना परत करण्याच्‍या हेतूने पोलीस मुख्यालयात कोरोनाविषयक नियम पाळून कार्यक्रम घेण्यात आला. मूळ मालकांना मोबाइल वाटप करण्याबरोबरच त्‍यांना सायबर जनजागृतीसंदर्भाने मार्गदर्शन करण्यात आले.

हरवलेल्या, चोरीस गेलेल्या किंवा गहाळ झालेल्या मोबाइलचा शोध कर्तव्‍यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा), अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव), पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांच्‍या आदेशाने सहायक पोलीस निरिक्षक विलासकुमार सानप, पोलीस अंमलदार ज्ञानेश नागरे, राजू आडवे, कैलास ठोंबरे, पवन मखमले, नंदकिशोर आंधळे, योगेश सरोदे, अमोल तरमळे, उषा वाघ यांच्‍या पथकाने लावला. मे 2021 अखेर 100 मोबाइल विविध ठिकाणांहून एकत्र करण्यात आले. नागरिकांनी त्‍यांचे मोबाइल हरवल्यास, गहाळ झाल्यास किंवा चोरीस गेल्यास निसंकोचपणे जवळच्‍या पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी केले आहे.