किनगाव राजात कोरोनाचा उद्रेक!; १७ बाधित आढळले; जिल्ह्यात नव्या ८९ बाधितांची भर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः किनगाव राजा (ता. सिंदखेड राजा) येथे कोरोनाचे 17 रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. आज, 2 जुलैला जिल्ह्यात एकूण 89 बाधितांची नव्याने भर पडली असून, 32 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2258 अहवाल प्राप्त …
 
किनगाव राजात कोरोनाचा उद्रेक!; १७ बाधित आढळले; जिल्ह्यात नव्या ८९ बाधितांची भर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः किनगाव राजा (ता. सिंदखेड राजा) येथे कोरोनाचे 17 रुग्‍ण आढळल्याने आरोग्‍य विभागाची चिंता वाढली आहे. आज, 2 जुलैला जिल्ह्यात एकूण 89 बाधितांची नव्याने भर पडली असून, 32 रुग्‍ण बरे झाल्याने त्‍यांना रुग्‍णालयातून सुटी देण्यात आली आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2258 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 2169 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 89 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 71 व रॅपिड टेस्टमधील 18 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 440 तर रॅपिड टेस्टमधील 1729 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर : 7, शेगाव तालुका : येऊलखेड 2, आडसूळ 1, देऊळगाव राजा शहर : 4, देऊळगाव राजा तालुका : पिंप्री आंधळे 1, चिंचखेड 1, मेहकर शहर : 1, मलकापूर शहर : 1, मलकापूर तालुका : उमाळी 2, खामगाव शहर : 1, खामगाव तालुका : किन्ही महादेव 1,लोखंडा 1, गोंधनापूर 1, अंत्रज 1, सुटाळा 2, नांदुरा शहर : 1, जळगाव जामोद तालुका : सावरगाव 2, वडगाव गड 1, खेर्डा बुद्रूक 1, जामोद 1, बोराळा बुद्रूक 2, सुनगाव 1, मांडवा 1, माहुली 4, सिंदखेड राजा शहर : 1, सिंदखेड राजा तालुका : कंडारी 1, चिंचोली 1, राहेरी 1, रूमणा 1, किनगाव राजा 17, चांगेफळ 1, दिग्रस 1, उमरद 2, निमगाव वायाळ 3, हिवरखेड 3, पिंपळगाव लेंडी 1, दुसरबीड 4, संग्रामपूर तालुका : भोन 1, चिखली शहर : 3, चिखली तालुका : भालगाव 1, नायगांव 6 अशाप्रकारे जिल्ह्यात 89 रुग्ण आढळले आहे.

153 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आज 32 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 578526 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86010 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1713 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 86826 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 153 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 663 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.