कियाराच्‍या मावशीसोबत होतं सलमानचं लफडं!

मुंबई ः अभिनेत्री कियारा आडवाणीचा आज, ३१ जुलैला २९ वा वाढदिवस आहे. तिचे वडील जगदीश मुंबईत राहतात. ते सिंधी असून, व्यापारी आहेत. तिची आई जिनेवीव जाफरी शिक्षिका आहे. तिला लहान भाऊसुद्धा आहे. तिचं नाव आधी आलिया होतं. सलमान खानने तिला हे नाव बदलण्याचा सल्ला दिला होता. कारण आलिया भट्ट आधी बॉलीवूडमध्ये सक्रीय असल्याने दोघींच्या समान …
 

मुंबई ः अभिनेत्री कियारा आडवाणीचा आज, ३१ जुलैला २९ वा वाढदिवस आहे. तिचे वडील जगदीश मुंबईत राहतात. ते सिंधी असून, व्यापारी आहेत. तिची आई जिनेवीव जाफरी शिक्षिका आहे. तिला लहान भाऊसुद्धा आहे. तिचं नाव आधी आलिया होतं. सलमान खानने तिला हे नाव बदलण्याचा सल्ला दिला होता. कारण आलिया भट्ट आधी बॉलीवूडमध्ये सक्रीय असल्याने दोघींच्‍या समान नावावरून कियाराने नुकसान होण्याची शक्‍यता होती. आश्चर्याची बाब म्‍हणजे कियाराची आई जिनेवीव सलमानची बालपणीची मैत्रीण आहे. सलमानने मावशी शाहीनसोबत अफेअरही ठेवले होते, असं कियाराने एका मुलाखतीत सांगितलं होतं. दोघांचं ते पहिलंच प्रेम होतं, असंही तिने म्‍हटले होतं. कियाराचा नवा चित्रपट शेरशाह येत्‍या १२ ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे.