कुत्रा आडवा आल्याने अपघात होऊन दुचाकीस्‍वार ठार, चिखली एमआयडीसीजवळील घटना, 1 गंभीर

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः कुत्रा आडवा आल्याने दुचाकीचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात 1 जण जागीच ठार तर 1 जण गंभीर जखमी झाला. हा अपघात आज, 8 एप्रिलला सकाळी 9 च्या सुमारास मेहकर-चिखली रोडवरील एमआयडीसीजवळ झाला. मोहाडी येथील विक्रम कोंडू इंगळे व सखाराम इंगळे मोहाडीवरून चिखलीकडे जात होते. चिखली एमआयडीसीजवळ कुत्रा आडवा आल्यामुळे हिरो होंडा मोटरसायकलचा …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः कुत्रा आडवा आल्याने दुचाकीचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात 1 जण जागीच ठार तर 1 जण गंभीर जखमी झाला. हा अपघात आज, 8 एप्रिलला सकाळी 9 च्या सुमारास  मेहकर-चिखली रोडवरील एमआयडीसीजवळ झाला.

मोहाडी येथील विक्रम कोंडू इंगळे व सखाराम इंगळे मोहाडीवरून चिखलीकडे जात होते. चिखली एमआयडीसीजवळ कुत्रा आडवा आल्यामुळे हिरो होंडा मोटरसायकलचा (क्र.एमएच 28 एम 2524) अपघात झाला. अपघातात सखाराम इंगळे (72) जागीच ठार झाले तर विक्रम कोंडू इंगळे (58) गंभीर जखमी झाले आहेत. दोघेही जण मोहाडी (ता. सिंदखेड राजा) येथील असून, विक्रम इंगळे यांना जखमी अवस्थेत औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.  सखाराम इंगळे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखलीच्‍या ग्रामीण रुग्‍णालयात आणण्यात आला. त्‍यांच्या पश्चात पत्‍नी, 2 मुले व 3 मुली असा परिवार आहे. अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.