कुपूत्र…! बायको सोडून गेली, दारू पिऊ लागला…आईवर केले चाकूचे वार!; खामगाव तालुक्‍यातील घटना

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कांदा कापण्याच्या चाकूने आईच्या हातावर वार करणाऱ्या कूपुत्राविरुद्ध पिंपळगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. निमकवळा (ता. खामगाव) येथे 6 मार्चच्या संध्याकाळी 6 वाजता ही घडली होती. सौ. मथुराबाई यादव मानकर (55, रा.निमकवळा) यांनी आज पिंपळगाव राजा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली की, मुलगा संतोषची पत्नी काही …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कांदा कापण्याच्‍या चाकूने आईच्‍या हातावर वार करणाऱ्या कूपुत्राविरुद्ध पिंपळगाव राजा पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. निमकवळा (ता. खामगाव) येथे 6 मार्चच्‍या संध्याकाळी 6 वाजता ही घडली होती. सौ. मथुराबाई यादव मानकर (55, रा.निमकवळा) यांनी आज पिंपळगाव राजा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली की, मुलगा संतोषची पत्नी काही दिवसांपासून माहेरी राहत असल्याने त्याला दारूचे व्यसन लागले आहे. तो नेहमी दारू पिऊन आई-वडिलांशी वाद घालतो. 6 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता त्‍याने आई व वडिलांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने आमच्याशी वाद घालणे सुरू केले. मी त्याला समजावत असताना त्याने हातातील कांदा कापण्याच्या चाकूने माझ्या डाव्या हाताच्या मनगटावर वार केला. तो नेहमी दारू पिऊन आम्हाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देतो, असे तक्रारीत म्‍हटले आहे. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.