कुलरचा शॉक लागून नवविवाहितेचा मृत्यू; सहा महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न; मलकापूर शहरातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कुलरचा शॉक लागून सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या नवविवाहितेचा मृत्यू झाला. ही घटना मलकापूर शहरातील राणाप्रतापनगरात आज, 30 जूनला दुपारी 12 च्या सुमारास घडली. दुर्गा महेश चांडक (30) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. घरकाम करत असताना बंद असलेल्या कुलरला धक्का लागला. कुलरमध्ये विद्युत प्रवाह असल्याने त्यांना विजेचा जबर धक्का बसला. …
 
कुलरचा शॉक लागून नवविवाहितेचा मृत्यू; सहा महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न; मलकापूर शहरातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कुलरचा शॉक लागून सहा महिन्यांपूर्वीच लग्‍न झालेल्या नवविवाहितेचा मृत्यू झाला. ही घटना मलकापूर शहरातील राणाप्रतापनगरात आज, 30 जूनला दुपारी 12 च्या सुमारास घडली.

दुर्गा महेश चांडक (30) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. घरकाम करत असताना बंद असलेल्या कुलरला धक्का लागला. कुलरमध्ये विद्युत प्रवाह असल्याने त्यांना विजेचा जबर धक्का बसला. ही बाब घरच्यांच्या लक्षात येताच त्यांना तातडीने मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.