कृषीपंप फिडरवरील वीजपुरवठा रात्रीही सुरू ठेवा ः खासदार जाधव यांचे महावितरणला पत्र

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गावात कोरोना संसर्ग वाढत असल्याने अनेक शेतकरी, ग्रामस्थ शेतात राहायला गेले आहे. त्यामुळे कृषी पंप फिडरवरील वीज पुरवठा रात्रीही सुरू ठेवावा, असे पत्र खासदार प्रतापराव जाधव यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना दिले आहे. शेतात राहणाऱ्या लोकांना साप, विंचूसारख्या विषारी जीवजंतूंमुळे धोका होऊ नये यासाठी वीज असणे आवश्यक आहे, असेही खासदार जाधव …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः गावात कोरोना संसर्ग वाढत असल्याने अनेक शेतकरी, ग्रामस्‍थ शेतात राहायला गेले आहे. त्‍यामुळे कृषी पंप फिडरवरील वीज पुरवठा रात्रीही सुरू ठेवावा, असे पत्र खासदार प्रतापराव जाधव यांनी महावितरणच्‍या अधीक्षक अभियंत्‍यांना दिले आहे. शेतात राहणाऱ्या लोकांना साप, विंचूसारख्या विषारी जीवजंतूंमुळे धोका होऊ नये यासाठी वीज असणे आवश्यक आहे, असेही खासदार जाधव यांनी पत्रात म्‍हटले आहे.