कृषी अधिकारी कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या उटी येथील दहा शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः फळबाग योजनेत वारंवार अर्ज करूनही कृषी सहायकाकडून योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना काल, २ सप्टेंबर रोजी मेहकर येथे घडली होती. याप्रकरणी कृषी अधिकारी कार्यालयातील सहायक अधीक्षकांनी शेतकऱ्यांविरुद्ध मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.तक्रारीवरून उटी (ता. मेहकर) येथील १० शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात …
 
कृषी अधिकारी कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या उटी येथील दहा शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः फळबाग योजनेत वारंवार अर्ज करूनही कृषी सहायकाकडून योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना काल, २ सप्टेंबर रोजी मेहकर येथे घडली होती. याप्रकरणी कृषी अधिकारी कार्यालयातील सहायक अधीक्षकांनी शेतकऱ्यांविरुद्ध मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.तक्रारीवरून उटी (ता. मेहकर) येथील १० शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय सुळकर, विष्णू आंधळे, देवानंद थोटे, मनोहर काठोळे, गोपाल चांदणे, प्रकाश लाड, अमोल धोडे, शेख सिराज शेख दादामिया, शेख राजू शेख रज्जाक, देवानंद सुळकर अशी गुन्‍हा दाखल झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.