कृषी सेवा केंद्र आता सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्र, कृषी निगडित दुकाने, कृषी प्रक्रिया उद्योग, शेती अवजारे आणि शेतातील उत्पादनाशी संबंधित दुकाने, तसेच कृषी विषयक सेवा आदी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा राहणार आहे. कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी कृषी निगडित दुकाने सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी …
 
कृषी सेवा केंद्र आता सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) : जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्र, कृषी निगडित दुकाने, कृषी प्रक्रिया उद्योग, शेती अवजारे आणि शेतातील उत्पादनाशी संबंधित दुकाने, तसेच कृषी विषयक सेवा आदी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा राहणार आहे. कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी कृषी निगडित दुकाने सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी होती. या आदेशात अंशत : बदल करण्यात आला आहे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष एस. रामामूर्ती यांनी दिले आहेत.