केंद्र सरकारने महाराष्ट्राला केली सर्वात जास्‍त मदत : देवेंद्र फडणवीस; चिखलीत आधार कोविड रुग्‍णालयाचे उद्‌घाटन

बुलडाणा (मनोज सांगळे, मो. 9822988820 ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः केंद्र सरकारने कोरोना काळात महाराष्ट्राला सर्वात जास्त मदत केली असून, रेमडेसिवीर, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर सर्वात जास्त पुरवठा महाराष्ट्राला केला आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिखलीत आधार कोविड केअर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी आज, 16 मे रोजी केले. आमदार सौ. श्वेताताई …
 

बुलडाणा (मनोज सांगळे, मो. 9822988820 ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः केंद्र सरकारने कोरोना काळात महाराष्ट्राला सर्वात जास्त मदत केली असून, रेमडेसिवीर, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर सर्वात जास्त पुरवठा महाराष्ट्राला केला आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिखलीत आधार कोविड केअर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी आज, 16 मे रोजी केले. आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी आधार कोविड केअर सेंटर सुरू करून रुग्णांवर मोफत उपचारासाठी पुढाकार घेतल्याने हे रुग्णालय रुग्णांचे आधार बनेल, असा आशावादही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

आमदार सौ. महाले पाटील आणि लोकसहभागातून स्व. दयासागरजी महाले यांच्या स्मृती प्रीत्यर्थ सुरू झालेल्या या रुग्‍णालयाचे उद्घाटन श्री. फडणवीस यांनी केले. यावेळी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्य भाजपा उपाध्यक्ष तथा माजी मंत्री डॉ. संजय कुटे, जिल्हाध्यक्ष ॲड. आकाश फुंडकर, माजी आमदार चैनसुख संचेती, सभापती सौ. सिंधूताई तायडे, उपनगराध्यक्षा सौ. नजिरा बी शेख अनिस, उपसभापती सौ शमशाद बी शाहिद पटेल, ज्‍येष्ठ नेते सतीश गुप्त, शरद भाला, डॉ. प्रतापसिंह राजपूत, ॲड. विजय कोठारी, रामकृष्णदादा शेटे, शहराध्यक्ष पंडितदादा देशमुख, तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, सभापती सौ.ममताताई बाहेती, सौ. विमलताई देव्हडे, गोविंद देव्हडे, नामु गुरूदासानी यांची उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजनचा पीएसए प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्व पीएसयूच्या मदतीने देखील देशात ऑक्सिजन प्लांट उभे राहत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत ऑक्सिजनची कमतरता पूर्णपणे दूर होईल, असे यावेळी श्री. फडणवीस म्‍हणाले. श्री. फडणवीस यांनी सुविधांयुक्त रुग्‍णालयाची पाहणी केली. या ठिकाणी 20 ऑक्सिजन तर 50 सर्वसामान्य खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

उपचारासोबत मानसिक ‘आधार’सुद्धा

चिखली येथील बहुतांश रुग्ण हे औरंगाबाद, अकोला व बुलडाणा येथे उपचारासाठी जातात. पण त्यांना तिथे बेड मिळत नाही. शिवाय तिथे त्यांना अव्वा च्या सव्वा रक्कम मोजावी लागते. आधार कोविड सेंटरच्या माध्यमातून आपण त्यांना मानसिक तसेच आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न करू. हे रुग्णालय राज्यात आदर्श कोविड सेंटर बनविण्यासाठी प्रयत्‍न करू, असे यावेळी आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी सांगितले.

खासगी डॉक्टरांनी सेवा द्यावी…

मोफत उपचार होणार असल्याने चिखली शहरातील खासगी डॉक्टरांनी या आधार कोविड सेंटरला आपली सेवा द्यावी, असेही आवाहनही आमदार सौ. महाले पाटील यांनी यावेळी केले.