कॉलेज फोडून पाऊण लाखांचा ऐवज लंपास; खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महाविद्यालय फोडून चोरट्यांनी 72 हजार 750 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शिर्ला नेमाणे (ता. खामगाव) येथील जी. व्ही. मेहता गुप्तेश्वर महाविद्यालयात आज, 20 मार्चला समोर आली आहे. चार क्लासरूमचे कडीकोयंडे तोडून चोरट्यांनी सीसीटीव्हीचा एलईडी, डीव्हीआर, ई-लर्निंगचे ओव्हरहेड, 2 पेनड्राइव्ह, रोख 650 रुपये सर्व कपाट्याच्या चाव्या असा एकूण 72500 रुपयांचा ऐवज …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः महाविद्यालय फोडून चोरट्यांनी 72 हजार 750 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शिर्ला नेमाणे (ता. खामगाव) येथील जी. व्‍ही. मेहता गुप्तेश्वर महाविद्यालयात आज, 20 मार्चला समोर आली आहे.

चार क्‍लासरूमचे कडीकोयंडे तोडून चोरट्यांनी सीसीटीव्‍हीचा एलईडी, डीव्‍हीआर, ई-लर्निंगचे ओव्‍हरहेड, 2 पेनड्राइव्‍ह, रोख 650 रुपये सर्व कपाट्याच्‍या चाव्या असा एकूण 72500 रुपयांचा ऐवज  लंपास केला. मुख्याध्यापक श्रीकृष्ण खंडारे यांनी हिवरखेड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. ही घटना 17 मार्चला घडल्‍याचे तक्रारीत म्‍हटले आहे.