कोचिंग क्लास टाकण्यासाठी 5 लाख हवे होते… विवाहितेने नकार देताच सुरू केला छळ!

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोचिंग क्लास टाकण्यासाठी माहेरहून 5 लाख रुपये आण, असे म्हणत विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी सासरच्या 5 जणांविरोधात आज, 22 जानेवारीला गुन्हा दाखल केला आहे.पती रवी आत्माराम चिंचोले (34), राधाबाई आत्माराम चिंचोले (60), अविनाश आत्माराम चिंचोले (37), लीला अविनाश चिंचोले (रा. आनंदनगर, चिखली) व छाया …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोचिंग क्लास टाकण्यासाठी माहेरहून 5 लाख रुपये आण, असे म्हणत विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी सासरच्या 5 जणांविरोधात आज, 22 जानेवारीला गुन्हा दाखल केला आहे.
पती रवी आत्माराम चिंचोले (34), राधाबाई आत्माराम चिंचोले (60), अविनाश आत्माराम चिंचोले (37), लीला अविनाश चिंचोले (रा. आनंदनगर, चिखली) व छाया गणेश हिवाळे (35 रा. सुंदरखेड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तक्रारदार महिलेने तक्रार दिली की, कोचिंग क्लास सुरू करण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आण म्हणून सासरची मंडळी तगादा लावत होती. त्यासाठी शारिरिक व मानसिक छळ केला जात होता. अखेर कंटाळून तिने पोलीस ठाणे गाठले.