कोचिंग क्‍लासेस, अभ्यासिका, ग्रंथालये उघडणार!, सकाळी ७ ते सायंकाळी ५ पर्यंत मुभा; “हे’ नियम पाळावे लागणार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोचिंग क्लासेस, खासगी शिकवणी वर्ग, खासगी प्रशिक्षण केंद्र, अभ्यासिका, ग्रंथालय आता सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. कोरोनाविषयक नियम पाळून त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे.प्रत्येक बॅचमध्ये जास्तीत जास्त १५ विद्यार्थी किंवा आसनक्षमतेच्या ५० टक्के क्षमतेची अनुमती देण्यात आली आहे. दोन बॅचमध्ये अर्ध्या तासाचे अंतर राहणार आहे. हॉल …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोचिंग क्‍लासेस, खासगी शिकवणी वर्ग, खासगी प्रशिक्षण केंद्र, अभ्यासिका, ग्रंथालय आता सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. कोरोनाविषयक नियम पाळून त्‍यांना जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे.
प्रत्‍येक बॅचमध्ये जास्‍तीत जास्‍त १५ विद्यार्थी किंवा आसनक्षमतेच्‍या ५० टक्‍के क्षमतेची अनुमती देण्यात आली आहे. दोन बॅचमध्ये अर्ध्या तासाचे अंतर राहणार आहे. हॉल व हॉलमधील सर्व साहित्‍य सॅनिटाईज करणे बंधनकारक आहे. याशिवाय सुरक्षित अंतर, मास्‍क व सॅनिटायझरचा वापर तसेच कोरोनाविषयक शासनाच्‍या नियमांच्‍या अधीन राहून ही परवानगी देण्यात आली आहे.